बदलापूरात 15 वर्षांपासून रखडलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकच्या उभारणीसाठी भीम सौनिकांचा मूक मोर्चाबदलापूर-कैलास जाधव

सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या विकसित होणारे शहर म्हणून बदलापूरकडे पाहिले जात आहे. मात्र याच बदलापूर शहरात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सोनिवली येथील स्मारक एका तपानंतरही पूर्ण होऊ शकले नाही.

गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या बदलापूर पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आंबेडकरी अनुयायांनी बदलापूर नगरपालिकेच्या मुख्यालयावर आज मूक मोर्चा काढून धडक दिली. विविध कारणांमुळे रखडलेल्या या स्मारकाच्या कामाला गती मिळावी, स्मारक समिती हटवावी आणि प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी निघालेल्या या मूक मोर्चात शेकडो आंबेडकर अनुयायींसह भीमसैनिक सहभागी झाले होते.

जातीय तिढा मिटवण्यासाठी आदर्श असलेला एक प्रयोग १९२७ साली बदलापूरात झाला होता. बदलापूरातील शिवजयंतीसाठी पांडुरंग भास्कर पालये शास्त्री यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केले होते. यावेळी डॉ. आंबेडकरांनी बदलापूरात मुक्कामही केला होता. याच आठवणी कायम रहाव्यात यासाठी बदलापूरातील सोनिवली येथे स्मारक बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. बौद्ध मंदीर, वाचनालय, सभागृह, पुतळा, निवास व्यवस्था, उद्यान अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आराखडा तयार करण्यात आला होता. गेल्या १५ वर्षांपूर्वी या स्मारकाच्या कामाला सुरूवात झाली. मात्र अद्याप या स्मारकाचा फक्त सांगाडा उभा करण्यात यश आले आहे. याच्या निषेधार्थ बदलापूरात आज आंबेडकरी अनुयायांनी मूक मोर्चा काढला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाची नोंद गिनिज बुकमध्ये करावी अशी फलकबाजी करत आंदोलकांनी मोर्चा काढला होता. शाम गायकवाड यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यानंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी बोलताना बोरसे यांनी स्मारकाच्या ठिकाणी १५ दिवसांच्या आत सुरक्षा रक्षक, वीज आणि पाणी देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आराखड्यानुसार पालिकेच्या निधीचा वाटा देण्यात येईल, असेही बोरसे यांनी स्पष्ट केले. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget