धारावीत दिव्या ढोलेयांचा नेतृत्वाखाली मोठया उत्साह पार पडले "CM चषक".


धारावीतील इतिहासात एखाद्या  पक्षातर्फे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य कला व क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. 

मुंबई 


महाराष्ट्रातील गोरगरीब सामान्य कुटुंबातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि आजच्या पिढीला व्हिडीओ आणि मोबाईल गेम मधून बाहेर पडून त्यांनी मैदानी खेळ खेळावेत जेणेकरून त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेची वाढ व्हावी याकरिता राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी "CM चषक" या नावाने देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव संपुर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमाने राबविला आहे.

धारावीत या चषकाचे "पालक" म्हणून भाजपच्या तरुण,तडफदार, युवा नेत्या, मुंबई सचिव श्रीमती दिव्या ढोले यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. मुख्यमंत्र्यांनी दिव्या ढोले यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी धारावी युवा मोर्चा अध्यक्ष दीपक सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने धारावीत CM चषक  अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात यशस्वी केला. दि. 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या दरम्यान शाहू नगर येथे भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांचे उद्घाटन भाजप मुंबई अध्यक्ष, आमदार श्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. तसेच या सामन्यांसाठी मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष श्री मोहित कंबोज, भाजप मुंबई महामंत्री श्री अमरजित मिश्रा, जिल्हाध्यक्ष श्री अनिल ठाकूर उपस्थित होते.

दि.09 डिसेंबर रोजी धारावी स्पोर्ट्स क्लब येथे कॅरम, धावणे, कुस्ती, रांगोळी, गायन आणि नृत्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या, यांचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष श्री अनिल ठाकूर यांच्या हस्ते झाले. अनेक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. याच दिवशी संत कक्कय्या मार्ग येथे सकाळपासूनच भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धारावीतील 2 महिला संघासहित एकूण 40 संघ सहभागी झाले होते. या कबड्डी सामन्यांसाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष , आमदार मा. श्री प्रसाद लाड, सौ. नीता प्रसाद लाड, संघटन मंत्री श्री सुनील कर्जतकर, साऊथ सेलचे अध्यक्ष श्री राजेश पिल्ले, मुंबई उपाध्यक्ष श्री वसंतराव जाधव,  मुंबई सचिव श्री हेमंत जांगला आणि धारावीतील विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री प्रसाद लाड यांनी दिव्या ढोले यांच्या नेतृत्व आणि व्यवस्थापनाची स्तुती केली आणि येणाऱ्या काळात दिव्या ढोले यांना धारावीत आमदार बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही असे ते म्हणाले.

धारावीतील इतिहासात एखाद्या राजकीय पक्षातर्फे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य कला व क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. धारावीतील हजारो युवकांनी यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशामागे  भाजपच्या युवा नेत्या, मुंबई सचिव दिव्या ढोले यांचे कुशल नेतृत्व आणि योग्य व्यवस्थापन कामी आले. त्यांनी भाजपच्या सर्व आजी-माजी, पुरुष-महिला व सर्व आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणून आपण एक यशस्वी नेता आहोत हे सिद्ध केले असे cm चषकाचा वेळी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget