दादर सार्वजनिक वाचनालय तर्फे मुंबई शहर ग्रंथोत्सव

दादर सार्वजनिक वाचनालय तर्फे मुंबई शहर ग्रंथोत्सव

मुंबई

एकशे अकरा वर्षाचा समृद्ध वारसा लाभलेला दादर सार्वजनिक वाचनालयात आज आणि उद्या मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात वाचन संस्कृती आणि ग्रंथ चळवळीला वाहिलेले दर्जेदार प्रबोधनात्मक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ग्रंथालय संचालनालय मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि दादर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने नावाच्या दासाराच्या धुरू नावाच्या धुरू सभागृहात या ग्रंथोत्सवाचे आयोजन केले आहे.आज10 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ग्रंथ पूजन ग्रंथदिंडीने हा ग्रंथ उत्सव सुरू झाला आहे.ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष धर्मेंद्र जोरे यांची प्रमुख प्रमुख किती होती.नंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात  आले. साडे अकरा ते दीड या दरम्यान वाचन संस्कृती व ग्रंथ चळवळ कशी वाढेल या विषयावर परिसंवाद झाला आहे.

 दोन तीस ते तीन तीस या वेळात नाट्य व खुली चर्चा रंगणार आहे.मी, फॅमिली, मोबाईल आणि वाचन संस्कृती या विषयाचा  त्यात वेध घेतला जाणार आहे.साडे तीन ते सायंकाळी सहा या वेळेत साहित्यातून उमललेले स्वरतरंग कार्यक्रम रंगणार आहे.उद्या मंगळवारी सकाळी 9:30 ते दहा तीस या वेळेत महात्मा गांधी यांचे साहित्य आणि विचार या विषयावर प्राध्यापक व्याप जवाहर मुथा यांचे व्याख्यान होईल.सकाळी दहा ते अकरा या दरम्यान मराठी भाषा उपरी होते का यावर रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून परिसंवाद होणार आहे.यात सुशीला महार राव, डॉक्टर लीला गोविलकर आणि कांचन घाणेकर यांचा सहभाग होणार आहे दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मराठी साहित्यातील आधुनिकता या विषयावर आधुनिकता या विषयावर रंगणाऱ्या परिसंवादात डॉक्टर शीतल पावस्कर ,लता पांचाळ, डॉक्टर प्रतिभा टेंबे या मतप्रदर्शन करणार आहेत. तर दुपारी दोन ते चार दरम्यान महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या आठवणींना त्यांचे कुटुंबीय उजाळा देणार आहेत. यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे जयंत देशपांडे आणि दीपा देशपांडे यांच्या बद्दलच्या आठवणी रसिकांसमोर उलगडणार आहेत.पु लं वरचा माहितीपट घरगुती किस्से आणि त्याचबरोबर पु लंच्या शब्दात फुलं ही ध्वनिफीत रसिकांना पाहायला मिळणार आहे.तसेच महेश मांजरेकर यांची उपस्थिती राहणार आहे त्यानंतर साडे चार ते पावणे पाच या दरम्यान गाजलांजली हा कार्यक्रम श्रोत्यांनामंत्र  मुग्ध करणार आहे .सायंकाळी सहा वाजता ग्रंथोत्सवाची सांगता सोहळा होईल अशी माहिती मुंबई शहर जिल्हा अधिकारी भीमराव जीवणे अध्यक्ष दासावा चे कार्याध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, प्रमुख कार्यवाह दत्ता कामथे यांनी दिली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget