आमच्या सर्व समाज बांधवांना व बहिणींकडून तसेच इंडियन सोसिएलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA ) कडून सप्रेम जयभीम... जयशिवराय.कैलास जाधव(प्रतिनिधी)

काल संपुर्ण महाराष्ट्रात बऱ्याच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपापल्या संघटनेच्या माध्यमातून संविधान दिन साजरा केला व संविधानाच्या प्रस्तावाचे वाचन केले.
त्याप्रमाणेच आमच्या इसरा च्या जिल्हा पदाधिकार्यांनी आपआपल्या जिल्ह्यात संविधान दिन साजरा करून संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन केले.
ज्या मध्ये मी स्वतः अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव येथे जिल्हा पदाधिकारी तसेच इंडियन सोशल मोव्हमेंट च्या टीम सोबत संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन केले सोबतच तेथील स्थानिक इस्रा च्या  पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना भारतीय संविधान भेट रुपात दान केले आणि हे संविधान रुपी धम्मदान सर्व पाहुण्यांना सुद्धा खूप अवडले.

                   आलेल्या पाहुण्यांनी संविधानाच्या अनेक पैलूंपैकी बरेच पैलू व्यवस्थितपणे समजावून सांगितले. आम्ही नेहमीप्रमाणे राजकारण असेल ,समाजकारण असेल किंवा धम्मकारण असेल काहीही आणि कुठलीही चळवळ चालवायची असेल तर त्या करीत आपले अर्थकारण सुद्धा तेवढ्याच जोरदारपणे केले पाहिजे तर आणि तरच आपल्या सर्व चळवळी यशस्वी होतील ह्याचा पुनरुच्चार केला .
आमचे स्पस्ट म्हणने आहे की ज्या समाजाचे अर्थकारण मजबूत आहे त्यांचे राजकारण,समाजकारण आणि धम्मकारण हे आपोआपच मजबूत होते. आणि समाजचे अर्थकारण मजबूत करायचे असेल तर समाजातील प्रत्येक कुटुंबात एक तरी लहान सहान का होईना पण उद्योग असला पाहिजे . आमचा समाज जेव्हा उद्योजकांचा समाज झालेला असेल तेव्हाच आम्ही आर्थिक दारिद्र्यतुन बाहेर पडू.आणि स्वाभिमानाने राजकारण करू .आणि जेव्हा स्वाभिमानाच्या राजकारणातून आमचे प्रतिनिधी विधानसभेत किंवा लोकसभेत पोहचतील तेव्हाच खऱ्या पद्धतीने आपल्याला संविधानाचे रक्षण करता येईल.अन्यथा कितीही संविधान साक्षरता कार्यक्रम घ्या अथवा संविधान जागर घाला परंतु आपले प्रतिनिधी विधानसभेत किंवा लोकसभेत नसतील तर मनुवादी व्यवस्था आणू पाहणारे लोक एक दिवस संविधान बद्दलविण्याशिवाय राहनार नाहीत ह्याचीही आपणास काळजी घ्यावी लागेल.
ह्या कार्यक्रमात प्रमूख पाहुणे म्हणून इंडियन सोशल मोव्हमेंट चे संस्थापक आयु आनंद होवाल सर, त्यांचे पदाधिकारी आयु सविता सोनवणे, आयु दिनेश खोल्लाम सोबत होते .

ह्याच प्रमाणे इंडियन सोसिएलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन( ISRA) च्या बाकी जिल्हा पदाधिकारयांनी सुद्दा छान कार्यक्रम पार पाडले ज्या मध्ये मुंबईच्या आमच्या महिला अध्यक्ष आयु मनीषा शार्दूल ह्यांनी स्वतःच्या पायाचे फॅक्चर असतानाही सुंदर असा कार्यक्रम घेतला .ठाणे चे  जिल्हा संघटक आयु कैलास जाधव ह्यांनी  त्यांच्या कार्यकर्त्यांसंमवेत सामूहिक कार्यक्रमात भाग घेतला.पालघर जिल्हा अध्यक्ष आयु प्रमोद जाधव यांनी त्यांच्या घरीच मोजक्या कार्यकर्त्याना बोलावून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.नंदुरबार जिल्हा संयोजक आयु मंगलदास पानपाटील ह्यांनी एका रात्रीत संविधान दिनाचा मेसेज फिरवून संविधान  प्रस्ताविकेचे वाचन भर चौकात केले.
अश्याच प्रकारे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात इस्रा संघटनेच्या माध्यमातून संविधान दिन साजरा केला गेला.
ह्यावरून आम्ही आज एक संकेत देत आहोत की जे पक्ष ,संघटना आज संविधान दिन साजरे करीत आहेत,येणाऱ्या काळात त्यांचेच प्रतिनिधी विधानसभेत आणि लोकसभेत संविधान दिन साजरा करतील आणि संविधान संपविण्याचे मनुवाद्यांचे कट कारस्थान उधळवून लावतील.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget