कुळगाव-बदलापूर पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम


कुळगाव-बदलापूर पोलीस स्टेशन तर्फे पोलीस काका व पोलीस दिदी उपक्रम
काराव येथील आश्रम शाळांना मदत
बदलापूर - (कैलास जाधव)
            कुळगाव-बदलापूर (ग्रा) पोलीस स्टेशन तर्फे पोलीस काका व पोलीस दीदी या उपक्रमाअंतर्गत परिसरातील आश्रम शाळेतील मुला-मुलींना मदत करण्यात आली.
          या पोलीस स्टेशन चे एपीआय अविनाश पाटील यांच्या पुढाकाराने व आयोजनाने नकुल पाटील आश्रमशाळा काराव, डॉ. तोरसकर ज्युनियर कॉलेज काराव, आदिवासी आश्रम शाळा लावाहली येथील ५० मुला-मुलींना ब्लॅंकेट्स वाटप करण्यात आले.
       थंडीचे महिने म्हणजे हिवाळा सुरू झाल्याने येथील आश्रम शाळेतील मुलांना ब्लॅंकेट वाटप करून पोलीस काका व पोलीस दीदी हा उपक्रम आम्ही आयोजित करून या मुलांना पोलीस हे आपलेच वाटले पाहिजे व भीती न बाळगता मनसोक्त पोलीस काका व पोलीस दिदींशी बोलता यावे व संवाद साधता यावा या करिता असे उपक्रम आम्ही आयोजित करतो असे या वेळी एपीआय अविनाश पाटील म्हणाले
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget