भाजपविरोधात रिपब्लिकन फ्रंटची स्थापना-

रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आणि दलित पँथर यांनी एकत्र येऊन आज रिपब्लिकन फ्रंटची स्थापन केली 
प्रतिक्रिया:दीपक दादा जगताप


(विशेष प्रतिनिधी )-
आगामी लोकसभा तसेच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध आघाड्या उभ्या राहत असून रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आणि दलित पँथर यांनी एकत्र येऊन आज रिपब्लिकन फ्रंटची स्थापन केली . संविधान तसेच ऍट्रॉसिटी रक्षणासाठी या फ्रंट मध्ये सर्व समविचारी पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन या फ्रंटचे एक  निमंत्रक दिलीपदादा जगताप यांनी केले आहे

सन  २०१९ मध्ये महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा व विधानसभा निवडणूक होत आहेत देशपातळीवर काँग्रेसने भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्याची तयारी सुरु केली असतानाच महाराष्ट्रातदेखील सर्व समविचारी पक्षांना सोबत ठेवण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी आहे . दरम्यान महाराष्रात काँग्रेसने भारिप बहुजन महासंघाला सोबत येण्याचे आवाहन केली असले तरी भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करीत या आघाडीत एमआयएम घेतले आहे .आंबेडकरांच्या या प्रयोगात रिपब्लिकन पक्षाचा एकही गट सहभागी करण्यात आलेला नाही . असा काँग्रेस आणि वंचित आघाडीत नसलेल्या रिपब्लिकन तसेच दलित पँथरच्या विविध गटांची आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे बैठक झाली . भाजपला सत्तेपासून रोखण्यासह रिपब्लिकन  पक्षाचे अस्तित्व या निवडणुकीत दाखविण्यासाठी रिपब्लिकन फ्रंटची घोषणा यावेळी करण्यात आली .

भारतीय संविधानाचे रक्षण तसेच ऍट्रॉसिटी कायद्याची प्रखर अंमलबजावणी करण्यासाठी हा फ्रंट आगामी काळात काम करणार असून आगामी निवडणुकीत रिपब्लिकन चळवळीचे अस्तित्व दाखविण्यासाठी सर्व समविचारी पक्ष संघटनांना एकत्र आणणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली . आज झालेल्या या फ्रंटच्या बैठकीत राजाराम खरात , सुखदेव सोनावणे,हरिदास टेम्भूर्णे ,यशपाल सरवदे,दिनेश गोडघाटे ,अमृत गजभिये, सोमनाथ सोनावणे सखाराम फाले , विजय पाटसूपे,यशवंत तेलंग,अशोक भिवगडे,सुनील हालंकार,मिलिंद जाधव श्रीरंग जाधव,संजय भालेराव, आदी प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित होते .
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget