जर राफेल विमान व्यवहार खरोखरच पारदर्शक असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न घाबरता JPC (जॉईंट पार्लियामेंटरी कमिटी) ची बैठक ताबडतोब बोलवावी - मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसच्या महामोर्चादरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी मागणी केली कि पंत्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा.......  
मुंबई प्रतिनिधी
मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आज महालक्ष्मी रेसकोर्स ते ऑगस्ट क्रांती मैदान असा काँग्रेसचा महामोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मोदी जी मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण देशात वाढणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल, राफेल विमान खरेदी व्यवहाराबद्दल, महिलांवरील अत्याचाराबद्दल, अल्पसंख्यांक आणि दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कधीही काहीच बोलत नाहीत. जे काही बोलतात ते लोकांचे मन विचलित करण्यासाठी नवीन नवीन जुमले सांगत असतात. राफेल घोटाळा हा या देशातील आज वरच्या इतिहासातील खूप मोठा घोटाळा आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना विचारायचे आहे की, जर तुम्ही म्हणता की राफेल विमान खरेदी व्यवहार पारदर्शक आहे. प्रामाणिकपणाने देशाच्या हितासाठी केलेला व्यवहार आहे. मग तुम्ही या खरेदी व्यवहाराचे मूल्य का सांगत नाहीत? आम्ही त्यांना संसदेत विचारले की, या राफेल विमान खरेदी व्यवहाराची खरी किंमत जाहीर करा. कारण जेव्हा आमचे सरकार असताना जेव्हा आम्ही या विमानांची किंमत प्रत्येकी ५६० करोड रुपये  होती. पण आज भाजप सरकारने हीच विमाने प्रत्येकी १६५० करोड रुपये दराने विकत घेतली आहेत. अशी ३६ विमाने घ्यायला आपल्या देशाने ४१, २०५ करोड रुपये जास्त मोजले. ही विमाने मूळ किमतीपेक्षा तिप्पट दराने विकत घ्यायचे कारण काय? हा या देशाचा, देशातील नागरिकांचा पैसा आहे. हा खूप मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार आहे आणि या घोटाळ्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यांचे बिंग फुटले आहे. त्यांनी अनिल अंबानींला मदत केलेली आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्रपती होलांदे यांनी सांगितले की, आम्हाला या विमानांचा करार अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीला द्यायचे नव्हते. तर आम्हाला हा कॉन्ट्रॅक्ट हिंदुस्थान एरोमॅटीक लिमिटेड ला द्यायचे होते. तसे आम्ही नक्की केले होते. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचे ऐकले नाही. त्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट रिलायन्स कंपनीला द्यावा यासाठी आमच्यावर दबाव टाकला. आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हता म्हणून आम्ही हा कॉन्ट्रॅक्ट अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्सला दिला. यावरून च हे स्पष्ट होते की, या घोटाळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. चौकीदार आता भागीदार झालेला आहे. ते चोरी तर हे करतातच आणि जगाला सांगत फिरतात की, मी खूप प्रामाणिक आहे, जगात सर्वात जास्त प्रामाणिक पंतप्रधान मीच आहे. पण फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींच्या विधानामुळे नरेंद्र मोदी यांचे खरे रूप जनतेसमोर आलेले आहे. आज आम्ही मागणी करत आहोत की, जर राफेल व्यवहारामध्ये खरोखरच पारदर्शकता आहे, तर या व्यवहाराची चौकशी कॅगमार्फत करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करत आहे की, जर आपण खरोखरच प्रामाणिक आहात, तर आपण ताबडतोब जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी (JPC) ची बैठक बोलवावी आणि या व्यवहाराबद्दल खरी माहिती जनतेला सांगावी. या कमिटीमध्ये सरकारतर्फे भाजपचे लोक  असतील. आमचे हि लोक असतील तसेच भाजपचे बहुमत आहे, मग तुम्ही कशाला घाबरता. तुम्हाला कसली भीती वाटते आहे. आमचे सरकार असताना जेव्हा जेव्हा JPC ची मागणी  करण्यात आली. तेव्हा तेच आम्ही JPC बसवली. त्या त्या विषयाचे स्पष्टीकरण दिले. आम्ही कधीही काहीही लपवले नाही. संसदेत उठलेल्या प्रत्येक प्रश्नाचे काँग्रेसने उत्तर दिले आहेत. मग तुम्ही का JPC ची बैठक का लावत नाहीत. कारण तुम्हाला भीती वाटते की, तुमचा भ्रष्ट्राचार आणि घोटाळा बाहेर पडेल. तुमची चोरी आता पकडली गेली आहे. जनता तुम्हाला चोर म्हणेल याची तुम्हाला भीती वाटत आहे. म्हणूनच तुम्ही JPC ची काही गरज नाही, असे सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी खोटे बोलत आहेत की, राफेल विमाने भाजप सरकार युपीए सरकारपेक्षा स्वस्त दरात विकत घेत आहेत. पण आमचा प्रश्न आहे की जर तुम्ही स्वस्त दरात राफेल विमाने विकत घेत आहेत. मग त्याची खरी किंमत सांगायला कशाला घाबरत आहेत. यावरूनच खरे काय ते स्पष्ट होते आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, आज आम्ही राफेल विमान खरेदीच्या घोटाळ्याविरोधात महालक्ष्मी रेसकोर्स ते ऑगस्ट  क्रांती मैदान असा मोर्चा काढला आहे. याच एतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकारविरोधात चले जाव चा नारा दिला होता. अरुणा असफ अली यांनी देशाचा तिरंगा याच मैदानात फडकावला होता आणि आज आम्ही याच मैदानावरून भाजप सरकार चले जाव असा नारा देत आहोत. राफेल विमान घोटाळ्यातील पैसा या देशातील जनतेचा पैसा आहे, या देशाचा पैसा आहे. भाजप सरकार राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबत विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये खोटे बोलत आहे. २०१९ मध्ये देशामध्ये निवडणूका आहेत. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच प्रामाणिक आहेत, त्यांचे सरकार जर खरोखरच प्रामाणिक आहे. तर त्यांनी २०१९ अगोदर JPC ची बैठक बोलवावी आणि राफेल घोटाळ्यातील पैसा कुठे गेला ते जनतेला सांगावे. 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम याप्रसंगी बोलताना म्हणाले की, आम्ही आज हजारो कार्यकर्त्यांसह महामोर्चा काढून रस्त्यावर उतरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचा राजीनाम्याची मागणी करत आहोत. भाजप सरकारच्या राफेल विमान घोटाळा प्रकरणी या दोघांनी राजीनामा दिलाच पाहिजे. हा खूप मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळा आहे. हा ४१२०५ करोडचा घोटाळा आहे. हा पैसा आपल्या देशाचा आहे, हा पैसा गरीब जनतेचा पैसा आहे, हा पैसा शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे आणि हा पैसा नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींच्या खिशात घातला. आमचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार हि मागणी केली आहे कि हा खूप मोठा घोटाळा आहे आणि याची संयुक्त संसदीय समिती मार्फत या संपूर्ण व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे. पण हे सरकार चौकशी करायला घाबरत आहे. जो पर्यंत नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन राजीनामा देत नाहीत तो प्रयन्त आमचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे. 

काँग्रेसच्या आजच्या या मोर्चामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधा कृष्णा विखे पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेसचे सचिव आशिष दुआ, सोनल पटेल, माजी मंत्री सुरेश शेट्टी, कृपाशंकर सिंग,  बाळासाहेब थोरात, खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार शरद रणपिसे, असलंम शेख, अमीन पटेल, नसीम खान, वर्षा गायकवाड, माजी आमदार चरण सिंग सप्रा, मधू चव्हाण, बलदेव खोसा, बाबा सिद्दीकी, अशोक जाधव, अलका देसाई, जिल्ह्ध्यक्ष सुनील नरसाळे, हुकुलराज मेहता, जिया उल रहमान, अशोक सुत्राळे आणि मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर, महिला काँग्रेस अध्यक्ष अजंता यादव, एससी सेलचे अध्यक्ष कचरू यादव व हजारोच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget