महाराष्ट्रातील १३ शहरांमध्ये पेट्रोल नव्वदी पार, मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे – संजय निरुपम.मुंबई :
आजचा दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘काळा दिवस’ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे. कारण आज मुंबई व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट्रोलच्या दराने १३ शहरांमध्ये नव्वदी पार केलेली आहे. राज्य सरकारला जनतेबद्दल जराही सहानुभूती नाही आहे. आजवरच्या काळातील सर्वात असंवेदनशील सरकार आहे, असे विधान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत काढले. या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील, प्रवक्ते अरुण सावंत आणि माजी नगरसेवक जॉर्ज अब्राहम उपस्थित होते. संजय निरुपम पुढे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात १३ जिल्हे असे आहेत, जिथे पेट्रोलचा दर ९० रुपयांपेक्षा जास्त आहे. परभणी, मुंबई, नंदुरबार, नांदेड, लातूर, जालना, जळगाव, हिंगोली, गोंदिया, बुलढाणा, औरंगाबाद आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचा दर ९० रुपयांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पेट्रोलचा दर नांदेडमध्ये आहे. नांदेड मध्ये पेट्रोल ९१.६१ रुपये प्रती लिटर आहे, अमरावती मध्ये ९१.३१ रुपये, रत्नागिरी मध्ये ९१.१४ रुपये आणि जळगावमध्ये ९१.०१ रुपये लिटर इतका पेट्रोलचा दर आहे. पेट्रोल आणि डीझेल च्या दरांमध्ये झालेली वाढ ही पूर्णतः राज्य आणि केंद्र सरकारने लादलेल्या विविध करांमुळे झालेली आहे. पेट्रोलवर सर्वात जास्त वॅट मुंबईमध्ये लावला जातो. मुंबईमध्ये ९० रुपये लिटर पेट्रोलमध्ये साधारणतः ४० ते ४५% टक्केवॅट लावला जातो. डिझेलवर २१%  वॅट लावला जातो. मागील २ वर्षांमध्ये आम्ही या दरवाढीविरोधात बरीच आंदोलने केली. मोर्चे काढले, काही दिवसांपूर्वी भारतबंद सुद्धा करण्यात करण्यात आला होता. पण एवढे करून सुद्धा सरकारला जाग आलेली नाही. जेवढी आंदोलने केली तेवढेच पेट्रोल महाग होत गेले. त्यामुळे महागाई सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. या दरवाढीचा परिणाम इतर गोष्टींवर सुद्धा होत आहे. टूथपेस्ट, तेल, साबण, वनस्पती तेल, या सर्व एफएमसीजी उत्पादनामध्ये आणि टीव्हीलॅपटॉपफ्रिज यांसारख्या  इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे दर ५ ते ७% वाढले आहेत. आमची भाजप सरकारकडे एकच मागणी आहे की, ज्याप्रमाणे आंध्रप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक राज्यांनी पेट्रोल व डिझेलवरील राज्य शासनातर्फे लावण्यात येणाऱ्या करांमध्ये (वॅट) कपात केली. त्याच प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनातर्फे लावण्यात येणाऱ्या करांमध्ये (वॅटमध्ये) कपात करावी. तसेच माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी आहे की, त्यांनी केंद्र सरकारतर्फे लावण्यात येणाऱ्या सेस (SES) मध्ये कपात करावी किंवा काढून टाकावे. सेस आणि वॅटमुळे पेट्रोल व डिझेलचे भाव संपूर्ण देशामध्ये गगनाला भिडलेले आहेत  आणि याच मागणीसाठी आम्ही भविष्यात मोठे आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहणार आहोत.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, राफेल विमान खरेदी घोटाळा हा संरक्षण मंत्रालयाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी चोर आहेत. १० एप्रिल २०१५ रोजी जेव्हा सर्वप्रथम या करारावर हस्ताक्षर करण्यात आले, त्यावेळेस फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष होल्लांदे उपस्थित होते. राफेल विमान व्यवहाराची पूर्व सूचना अनिल अंबानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिली होती. या कराराच्या आधी फक्त १० दिवस अगोदर अनिल अंबानीच्या कंपनीचे रजिस्ट्रेशन केले गले. आम्ही संपूर्ण जनतेतर्फे मागणी करत आहोत की, राफेल घोटाळ्याची संपूर्ण जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकारावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि याच मागणीसाठी आम्ही गुरुवार दि. २७ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी १ वाजता काँग्रेसतर्फे महालक्ष्मी रेसकोर्स ते ऑगस्ट क्रांती मैदान मोर्चा काढणार आहोत. या मोर्चामध्ये काँग्रेसचे सर्व मोठे नेते, आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असून हा आतापर्यंत काढण्यात आलेला मुंबईतील सर्वात मोठा मोर्चा असणार आहे, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.  

संजय निरुपम पुढे म्हणाले की, २ ऑक्टोबर २०१८ रोजी गांधी जयंतीच्या दिवसापासून संपूर्ण भारतभर काँग्रेसतर्फे “लोकसंपर्क अभियान” सुरु करण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत संपूर्ण भारतातील साडेसात लाख बूथमधील प्रत्येक घराघरामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जाणार आहेत आणि भाजप सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती देणार आहेत. हे अभियान १९ नोव्हेंबर २०१८, इंदिरा गांधी जयंती पर्यंत सुरु राहील, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार राम पंडागळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राम पंडागळे म्हणाले की हे भाजपा सरकार फक्त दलित समाजावर अन्याय आणि अत्याचार करण्यासाठी सत्तेवर आलेले आहे. या चार वर्षात दलित समाजावर सर्वात जास्त अन्याय झालेले आहेत. काँग्रेस पक्षच फक्त दलित समाजाचे भले करू शकतो. अन्याय दूर करू शकतो, दलित तरुणांना रोजगार मिळवून देऊ शकतो म्हणून आम्ही सर्व कार्यकर्तेकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि मुंबईकाँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर विश्वास ठेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget