सायन येथील तलाव बंद करण्याच्या निर्णया प्रकरणी पालिका र-थायी समितीत चांगलेच पडसाद


शिवसेनेचा तीव्र विरोध
पुढच्या वर्षी विसर्जनाचा पेच निर्माण होणार
पालिकेने फेरविचार करण्याचे करण्याचे  निर्देश
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महत्त्वाच्या आणि  ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेला शीव येथील प्रसिध्द सायन तलाव पुढील वर्षी बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्या प्रकरणी आज शुक्रवारी पालिका स्थायी समितीत चांगलेच पडसाद उमटले सत्ताधारी शिवसेनेने आहे तीव्र विरोध केला पालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. तलाव बंद करण्याच्या निर्णयाबाबत प्रशासनाने फेर विचार करावा असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले. मात्र तलाव बंद झाल्यास पुढच्या वर्षी विसर्जनाचा पेच निर्माण होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले
  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या नगरीत मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा होत आहे गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी मुंबईत तेवढी तलाव नाही असे असताना पालिकेने तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे पालिकेने तलाव बंद करण्याबाबतचे नोटीस काही दिवसांपूर्वी पालिकेने तलावाच्या ठिकाणी लावले आहे. सायन तलावात परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. दीड दिवसांच्या गणपतीच्या मूर्तींचे येथे विसर्जन केले जाते ते पुढील वर्षीपासून बंद केले जाणार आहे. इतकी वर्ष गणेश विसर्जन येथे मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे तलाव बंद झाल्यास विसर्जन कुठे करणार अशी विचारणा स्थानिक रहिवाशी विचारू लागले आहेत. हा निर्णय घेताना स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधींना विश्वासात का घेतले नाही, असा सवाल करीत प्रशासनाने हा तलाव बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी मंगेश सातमकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. केमिकलमुळे मासे मरतात, पर्यावरणाचा ऱ्हास होतो, हे मान्य असले तरी तलाव बंद करण्याचा निर्णय योग्य नाही. विसर्जनासाठी योग्य असलेले हे तलाव बंद करू नये अशी मागणीही सातमकर यांनी केली. काही वर्षापूर्वी हा तलाव बुजवण्याचा घाट घातला होता. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केल्याने हा निर्णय प्रशासनाने मागे घेतला होता. आता पुन्हा तलाव बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्याला शिवशेनेने विरोध केला आहे. तर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सातमकर यांच्या हरकतीच्या मुद्द्याला समर्थन देत तलाव बंद करण्याचा निर्णय घेताना प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींना का विचारले नाही, असा सवालही त्यांनी विचारला. इतकी वर्ष या तलावांत गणशे मूर्तींचे विसर्जन केले जात असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता तलाव बंद करण्याचा निर्णय घेणे योग्य नाही. प्रशासनाने यावर विचार करावा, असे निर्देश देत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget