श्री. गणेशाच्या आगमनासाठी महापालिका सर्व सुविधांनी सज्‍ज – महापौर


मुंबई  ( प्रतिनिधी ) –   श्री गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्‍मुंबई महापालिकेने चौपाटयांसह श्री. गणेश विसर्जन स्‍थळांवर सर्व सुविधांनीयुक्‍त उत्‍तम अशी व्‍यवस्‍था केली असून गणेशाच्‍या आगमनासाठी पालिकेची सर्व यंत्रणा सज्‍ज आहे. या  सुविधांमध्‍ये कोणत्‍याही प्रकारची त्रुटी न राहता गणेशभक्‍तांची गैरसोय होऊ नये म्‍हणून मुंबईतील सर्व चौपाटया व विसर्जन स्‍थळांना भेटी देऊन पाहणी करीत असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.
   मुंबईचे महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी बृहन्मुंबई क्षेत्रातील मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांतील विविध चौपाटय़ांची आज शनिवारी  पाहणी केल्‍यानंतर प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी सभागृह नेता श्रीम.विशाखा राऊत, आमदार  विलास पोतनिस, आमदार  सरदार तारासिंग,विधी समिती अध्‍यक्षा श्रीम.सुवर्णा करंजे,  ‘जी/उत्‍तर’ प्रभाग समिती अध्‍यक्ष श्रीम.मरिअम्‍माल मुथु थेवर,  ‘आर/मध्य व आर/उत्तर’ प्रभाग समितीच्या अध्यक्षा श्रीमती रिध्‍दी खुरसंगे, नगरसेविका सर्वश्रीम. संध्‍या दोशी,श्‍वेता कोरगांवकर,  चंद्रावती मोरे, रजनी केणी, माजी नगरसेवक अनिल त्र्यंबककर,  उप आयुक्त (परिमंडळ – ३) आनंद वागराळकर, उप आयुक्त (परिमंडळ – ४)  किरण आचरेकर, उप आयुक्त (परिमंडळ – ७) अशोक खैरे, उप आयुक्त (परिमंडळ – १)  हर्षद काळे, उप आयुक्त (परिमंडळ - ६)  रणजीत ढाकणे व संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच संबंधित  अधिकारी उपस्थित होते.प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर म्‍हणाले प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेशोत्सव हा भव्य – दिव्य स्वरुपात तसेच सुनियोजितरित्या साजरा व्हावा, यासाठी पालिका प्रशासन कार्य करीत असते. गणेशोत्‍सव बघण्‍यासाठी देश –विदेशातील पाहुणे गिरगाव चौपाटी येथे असून त्‍यांच्‍यासाठी गतवर्षीप्रमाणे सर्व सुविधांनीयुक्‍त  सुसज्‍ज मंडपाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असल्‍याचे महापौरांनी सांगितले.पालिकेने केलेल्‍या व्‍यवस्‍थेची आज पाहणी केल्‍यानंतर पालिकेचे सर्व संबधीत विभाग गणेशोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी झटत असून नागरिकांनी सुध्‍दा पालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले. गणेश मूर्ती विसर्जन स्थळांवर अतिरिक्त तराफे, बोटी, जीवरक्षक, स्टील प्लेटस्, मोटरबोट, प्रथमोपचार केंद्र व रुग्णवाहिका, तात्पुरती शौचालये, जर्मन तराफा, सर्च लाईट, स्वागत कक्ष आदींची पुरेशी व्यवस्था पालिका प्रशासनाने केली असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले. महापौरांसह पदाधिकारी व अधिकारी यांनी ‘डी’ विभागातील गिरगांव चौपाटी,  ‘जी/उत्‍तर’ विभागातील दादर चौपाटी, माहिम चौपाटी, ‘के/पश्चिम’ विभागातील जुहू चौपाटी, ‘पी/उत्तर’ विभागातील मार्वे चौपाटी,  ‘आर/मध्य’ विभागातील गोराई जेट्टी, ‘एस’ विभागातील पवई तलाव, भांडुपेश्वर कुंड आणि ‘टी’  विभागातील पूर्व द्रुतगती महामार्गावरचे मोरया उद्यान तलाव व ‘ एफ/उत्‍तर’ विभागातील  सायन तलाव यांची पाहणी केली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget