२ लाख ३५ हजार ३७३ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन


कृत्रिम तलावांत ३४ हजार ५८४ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन
श्री गणेश मूर्ती विसर्जन सोहळा शांततेत पार पाडल्याबद्दल महापौरांतर्फे मुंबईकरांचे आभार
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) –  मोठय़ा भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात मुंबईनगरीत आगमन झालेल्या श्री गणरायाला मुंबईकरांनी रविवारी भावपूर्ण वातावरणात नि शांततेत निरोप दिला पालिकेला सहकार्य करणाऱया पोलीस, वाहतूक, नौदल, शासकीय, निम-शासकीय, तटरक्षक दल, हॅम रेडिओ आणि प्रसारमाध्यमे, खासगी संस्था तसेच एन. एस. एस., एन. सी. सी., अनिरुद्ध ऍकेडमी, श्री श्री रविशंकर ऍकेडमी तसेच समस्त मुंबईकर नागरिकांचे मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर व पालिका आयुक्त  अजोय मेहता यांनी आभार मानले आहेत. पालिकेने संपूर्ण बृहन्मुंबईत केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल  सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले आहे.
  श्री गणेश उत्सव विसर्जन प्रसंगी उच्च न्यायालय, मुंबई यांचे मुख्य न्यायाधीश, महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळातील विविध विभागांचे मंत्री, खासदार, आमदार, मुख्य सचिवांसह विविध खात्यांचे सचिव, सनदी अधिकारी, पोलिस यंत्रणा, विविध पक्ष संघटना यांचे पदाधिकारी, सेवाभावी संस्था, मुंबईतील विविध देशांचे वाणिज्य दूत, पर्यटक, नागरिक आदी या सोहळ्यात सामील झाले होते. मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी मुंबईतील विविध चौपाटय़ांसह विसर्जन स्‍थळांना भेटी देऊन विसर्जन व्‍यवस्‍थेची पाहणी केली होती तसेच अनेक श्री गणेश मंडळांनाही भेटी दिल्‍या होत्‍या. तसेच श्रींच्या मूर्ती विसर्जनानंतर लगेचच पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापनाने सर्व विसर्जन स्थळांवरील तसेच रस्त्यांवरील कचरा व इतर टाकाऊ साहित्य सुमारे १ हजार  टन निर्माल्य गोळा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आज सोमवारी सकाळपासून पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेऊन स्वच्छ ठेवण्याचे कार्य केले. याबद्दलही महापौरांनी या सर्व पालिका कर्मचारी व अधिकाऱयांचे अभिनंदन केले आहे. २०१७ मध्‍ये १३७२ टन निर्माल्‍य गोळा करण्‍यात आले होते. त्यासोबतच पालिकेच्या २४ विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त व त्यांची संपूर्ण यंत्रणा तसेच मध्यवर्ती यंत्रणा यांनी आपापल्या हद्दीतील साफसफाई व स्वच्छतेचे कार्य पूर्ण केल्याबद्दलही महापौरांनी त्यांचेही अभिनंदन केले आहे गिरगांव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम चौपाटी, जुहू चौपाटी, खारदांडा, शिवडी जेट्टी, वेसावे जेट्टी, मढ-मार्वे जेट्टी, आरे कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज तलाव (शीतल तलाव), पवई तलाव, मुलुंड, भांडुप आदी मुख्य गणेश विसर्जनस्थळी तसेच ३१ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी पालिकेची सर्व यंत्रणा श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी सुसज्ज ठेवण्यात आली होती.यावर्षी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यात घरगुती गणेशमूर्तीमध्‍ये १४ सप्‍टेंबर  प्रथम दिवसाला ८२, ४३० तर सार्वजनिक गणपती ४९८,  पाचवा दिवस म्‍हणजे १७ सप्‍टेंबरला घरगुती गणेशमूर्तीमध्‍ये ८३,५७१ तर सार्वजनिक गणपती ३००१, १९ सप्‍टेंबर २०१७ ला म्‍हणजे सातव्‍या दिवशी घरगुती गणेशमूर्तीमध्‍ये १७४८२ तसेच सार्वजनिक गणपतीमध्‍ये २३७३ तर २३ सप्‍टेंबरला अकराव्‍या दिवशी घरगुती गणेशमूर्तीमध्‍ये ३८, ५४३ तर सार्वजनिक गणपतीमध्‍ये ७४७५ अश्‍या एकूण २ लाख २२ हजार ०२६ घरगुती गणेशमूर्ती तर १३ हजार ३४७ सार्वजनिक गणपती अश्‍याप्रकारे घरगुती व सार्वजनिक दोन्‍हीमिळून २ लाख ३५ हजार ३७३ गणेशमूर्तींचे नैसर्गिक स्‍त्रोतमध्‍ये विसर्जन करण्‍यात आले. तसेच कृत्रिम तलावांमध्ये सार्वजनिक ८४३,  घरगुती ३२ हजार ९५९ तर ७८२ गौरींचे अश्‍या एकूण ३४ हजार ५८४ मूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले.गतवषी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या एकूण २ लाख ०२ हजार ३५२ इतकी होती व कृत्रिम तलावांमधील श्री गणेशमूर्तींची संख्या २९ हजार २८३ इतकी होती.पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात निर्माल्य कलश विविध विसर्जनस्थळी ठेवण्यात आले होते. निर्माल्य वाहतुकीसाठी टेम्पो आणि ट्रक्स यांची व्यवस्था प्रत्येक विभागात दिवस आणि रात्र पाळीत मागणीनुसार करण्‍यात आली होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget