नवे अतिरिक्‍त पालिका आयुक्‍त संजय सेठी


मुंबई  ( प्रतिनिधी ) –  महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी बृहन्‍मुंबई महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त म्‍हणून अतिरि‍क्त महापालिका आयुक्‍त  (प्रकल्‍प) डॉ. संजय मुखर्जी यांच्‍याकडून आज शुक्रवारी रोजी सायंकाळी पदभार स्वि‍कारला.
संजय सेठी हे भारतीय प्रशासकीय सेवेच्‍या १९९२ च्‍या बॅचचे अधिकारी असून त्‍यांनी ‘लंडन स्‍कूल ऑफ इकॉनामिक्‍स’  मधून अर्थशास्‍त्रामध्‍ये ‘ मास्‍टर’ ची पदवी प्राप्‍त केली आहे. त्‍यांनी ठाणे व नागपूर पालिकेचे आयुक्‍त  म्‍हणून काम केले असून त्‍यासोबतच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्‍त आयुक्‍त म्‍हणून सुध्‍दा काम केले आहे. एकूण २६ वर्षाच्‍या आपल्‍या प्रशासकीय कारकिर्दीत त्‍यांनी भारत सरकार व  महाराष्‍ट्र शासनामध्‍ये अश्‍या विविध महत्‍वपूर्ण पदावर काम केले आहे .

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget