सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन होणार सतरा दिवसांनी

सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन होणार सतरा दिवसांनी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठीक ठिकाणी रविवारी मिरवणुका काढत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय घोषा मध्ये गणरायाला निरोप देण्यात आला कुठेही डीजे डॉल्बी चा वापर करण्यात आला नाही उत्साहपूर्ण फुलांची व गुलालाची उधळण करत बाप्पा च्या जयघोषात रात्री उशिरापर्यंत मिरवणुका काढत गणरायाला निरोप देण्यात आला जिल्ह्यात खेडया-पाडयात गणेश चतुर्थी दिवशी श्री गणरायाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होते..तर काहीजण आपल्या घरातील पूजन केलेल्या श्री गणरायाचे दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस तर अकरा दिवस गणरायाचे पूजन करतात..तर जास्तीत जास्त भक्त मंडळी अनंत चतुर्थीदशी दिवशी श्री गणरायाचे पाण्यात विसर्जन करतात..तर काही ठिकाणी 17 दिवस,19 दिवस तर 21 दिवस,तर 42 दिवस श्री गणरायाचे पूजन केले जात
परंतु जास्तीत जास्त भक्त मंडळी आपल्या घरामध्ये पूजन केलेल्या श्री गणरायाचे अनंत चतुर्थीदशी दिवशी पाण्यात विसर्जन करतात..तर सिंधुदुर्गच्या राजाचेही गेली आठ वर्षे वाजत गाजत मिरवणूकीने फटाक्यांच्या आतषबाजी, ढोल ताशांच्या गजरात अनंत चतुर्थीदशी दिवशी पाण्यात विसर्जन करण्यात येत होते..यंदा 17 व्या दिवशी होणार श्री गणरायाचे पाण्यात विसर्जन
यंदा मात्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग राजाचे 17 दिवस पुजन केले जाणार असुन, त्यामुळे या राजाचे दर्शन सर्व भाविकांना होणार आहे..तसेच यावर्षी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा, फुगडी, संयुक्त दशावतार अशा भरगच्च कार्यक्रमांसह जिल्ह्यातल्या कलाकारांनाही कला सादरीकरणाची संधी उपलब्ध होणार आहे..तरी सर्वानी या महाउत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, यांनी केले आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget