दादरच्या माकेॅटमध्ये बेकायदेशीरपणे पाच र-टाॅल उभारले पालिका र-थायी समितीत चांगलेच पडसाद


मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिका मुख्यालयात पुन्हा वारे वाहू लागले आहेत पालिकेची अनधिकृत बांधकामांवर  एकीकडे कारवाई सुरु असताना दुसरीकडे एका रात्रीत दादरच्या मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे पाच स्टॉल उभारण्यात आले आहेत या प्रकरणी आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलेच पडसाद उमटले सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर विकास नियोजन आणि इमारत विभागाच्या संगनमताने बांधकाम झाले आहे. याप्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.अखेर हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत पालिका स्थायी समिती अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले त्यामुळे पालिका काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे
मुंबईत महत्त्वाचे दादर मानले जात असून चोवीस तास गजबजलेला असतो या दादरमधील हॉकर्स प्लाझामध्ये फुटपाथवरील दुकानांसाठी १५० गाळे बांधण्यात आले. परंतु येथील दुकानदार आजही दुकानांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, मार्केट विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिका अधिनियामांची पायमल्ली करुन हॉकर्स प्लाझामध्ये गाळे रिक्त असताना एका रात्रीत पाच गाळे बांधले आहेत. मोकळ्या जागेत हे बांधकाम झाले असून कोणाच्या सांगण्यावरुन बांधकाम झाले, याचा प्रशासनाने खूलासा करावा, असा आरोप समिती सदस्य प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केला. तसेच स्थायी समितीने मार्केटची पाहणी करावी, अशी मागणी केली. या मुद्द्याचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन करुन पदनिर्देशित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. विकास नियोजन व इमारत विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने पालिकेला हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागत असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला. तर दादरमध्ये काही दुकानदारांना वांद्रे व कुर्ला येथे गाळे देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप त्यांना तिकडे गाळे देण्यात आलेले नाहीत. त्यात हॉकर्स प्लाझामध्ये एकाच रात्रीत अनिधकृतपणे बांधण्यात आलेल्या पाच गाळ्यांचे प्रकरण समोर आल्याने प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवडे निघत आहेत. मार्केट विभागातील अधिकारी नियम धाब्यावर बसवत असून स्वतःच नियमांचे उल्लंघन करत आहेत, असा आरोप सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केला. तसेच या मागे मार्केट विभागातील बड्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. अभिजित सावंत, सदा परब या नगरसेवकांनी पालिकेच्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांचा तपशील स्थायी समितीला सादर करण्याची मागणी केली. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या कामाची आणि बेकायदा स्टॉलची माहिती, समितीला सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले .त्यामुळे पालिका काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget