बायोमॅट्रीक हजेरी नगरसेवकांनाही बंधनकारक

पालिका सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होणा-या नगरसेवकावर आता लवकरच सीसीटीव्ही यंत्रणेध्दारे नजर
बायोमॅट्रीक हजेरी नगरसेवकांनाही बंधनकारक
सभागृहात लागणार सीसीटीव्ही
मुंबई ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबई पालिकेतील नगरसेवकावर आता लवकरच सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर असणार आहे पालिका सभागृहाच्या हजेरी पुस्तीकेवर सही करून सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होता चक्क सभागृहाबाहेरून पळ काढणाऱ्या नगरसेवकांसाठीआता बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे.तसेच पालिका सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होणाऱ्या नगरसेवकांवर आता सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे नजर ठेवली जाणार आहे मात्र यातून महापौर आणि उपमहापौर यांना या निर्णयातून वगळण्यात येणार आहे.त्यामुळे पळ काढणा-या नगरसेवकांना या निणॅयाची चांगलीच झळ बसणार आहे
   मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे या नगरीतील विकास कामावर , समर-या आणि अनेक विषयावर  पालिकेच्या सभागृहात चर्चा केली जाते. विकास कामे मंजुर केली जातात. धोरणात्मक निर्णयही घेतले जातात. अशावेळी नगरसेवकांची उपस्थिती महत्त्वाची असते. केवळ हजेरी नाही तर पुरेशी संख्याही महत्त्वाची असते. पालिका सभागृहाच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांना सभागृहाबाहेरील नोंदवहीमध्ये सही करून प्रवेश दिला जातो. परंतु अनेक वेळा नगरसेवक येथे हजर नसतात. तर काही नगरसेवक केवळ नोंदवहीत हजेरी लावून परस्पर घरी निघून जातात. अशावेळी महत्वाच्या निर्णयावर निर्णय घेताना, राजकीय पक्षांना अडचणीस सामोरे जावे लागते. मुंबईतील समस्यांचे निराकरण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र, काही नगरसेवकांना सभागृहातील कामकाजाची माहिती नसते. परिणामी नगरसेवकांचा सभागृहाच्या कामकाजात सहभाग असावा यासाठी सभागृहाच्या दरवाजाच्यावर बायोमेट्रीक मशीन आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. महापौरांनी ही मागणी मंजूर करुन पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवली. आयुक्त अजोय मेहता यांनी यावर सकारात्मक अभिप्राय देताना, सीसीटीव्ही यंत्रणा आणि बायोमेट्रीक मशीन लावण्याचे निर्दश प्रशासनाला दिले आहेत. यातून महापौर व उपमहापौर यांना वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसणार आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget