मुंबईतील गणेश मंडळांना आता मिळणार सुरक्षा ऑडिटचे धडे


मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोणत्या ना कोणत्या कारणाने आगी लागत आहे आतातर मुंबईत दोन दिवसांनंतर सवाॅचा लाडका गणपती बाप्पाचा उत्सव आहे या उत्सवात कोणतेही गालबोट लागू नये यासाठी आता सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत मुंबईत लागणाऱ्या आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंडपांच्या सुरक्षितेसाठी सेवाभावी संस्था आपत्कालिन परिस्थितींवर तात्काळ उपाययोजना करण्याचे धडे मंडळातील कार्यकर्त्यांना देणार आहेत
  गणपती बाप्पाचा सन जवळ आला की गणेश भक्त या उत्सवासाठी कामाला लागतात या  गणेश उत्सवाला व्यापक स्वरूप  आले आहे. गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नसुद्धा मोठा गंभीर होत चालला आहे. मुंबईतील काही प्रसिद्ध गणेश मंडळांच्या मंडपात एकावेळी दोन ते तीन हजार भाविक उपस्थित असतात, अशा वेळी आगीची घटना घडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. गणेशोत्सावात होणाऱ्या ट्राफिक जॅम मुळे अग्नीशमन यंत्रणा पोहचेपर्यंत अनेक निरपराध नागरिकांचा जीवही  जाऊ शकतो. याच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गेली सात वर्षे  “फायर अँड  सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया” ही  सेवाभावी संस्था फायर अँड सेक्युरिटी ऑडिटच्या  माध्यमातून गणेश मंडळांना सहकार्य करीत आहे. विनामोबदला घेता मंडपात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गणेश मंडळांना योग्य ते मार्गदर्शन करीत आहेत. योग्य स्पॉटला सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, रोषणाई करताना केलेली वायरींगची तपासणी, आग विझवण्याच्या साधनांची तपासणी, आपत्कालीन वेळी बाहेर निघण्याची व्यवस्था, मेटल डिटेक्टर सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन परिस्थितीत उपाय करण्यासाठी मंडळातील कार्यकर्त्यांना मॉक ड्रीलचे प्रशिक्षणावर आधारित संस्थेकडून सुरक्षा ऑडिटचे मार्गदर्शन दिले जात आहे. उत्सवादरम्यान कोणतीही आपतकालीन परिस्थिती उद्भवली तर सरकारी यंत्रणांची मदत पोहचेपर्यंत बचाव कार्य कसे करायचे याबाबत कार्यकर्ते प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. आमची संस्था २००२ सालापासून फायर प्रोटेक्शन, लाइफ सेफ्टी, सिक्युरिटी, बिल्डींग ऑटोमेशन, लॉस प्रिवेंशन आणि रिस्क मॅनेजमेंट या क्षेत्रात सरकारी संस्थांसोबत काम करीत आहे. मुंबईत दोन हजारहुन अधिक गणेश मंडळे आहेत. दरवर्षी गणेशमूर्ती पाहण्यासाठी पर्यटक व भाविकांची गर्दी वाढतच आहे. आमच्या संस्थेची  मुंबईतील सामाजिक उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे. गेल्यावर्षी २५० मंडळांनी यात सहभाग घेतला होता. यंदा ३०० गणेश मंडळांचे सुरक्षा ऑडिट करावयाचा मानस आहे, अशी माहिती फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई चॅप्टरचे अध्यक्ष अश्विन ईजंतकर यांनी दिली. तसेच अनेक गणेश मंडळाकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हा महत्वपूर्ण उपक्रम राबवीत आहोत. गणेश मंडळाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. गणेश मंडळातील कार्यकर्ते हे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. म्हणूनच उत्तम प्रकारे सुरक्षितता देणाऱ्या मुंबईतील  गणेश मंडळाना आमची संस्था रोख रक्कम व पुरस्कार देऊन त्यांचे सामाजिक मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे संस्थेचे मार्केटींग व ब्रॅडिंगचे प्रमुख आर्किटेक्ट श्रेयश आत्माराम सरमळकर यांनी सांगितले आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget