विद्यार्थ्‍यांची वैचारिक क्षमता वृंध्‍दीगत करण्‍यामध्‍ये शिक्षकांची महत्‍वपूर्ण भूमिका – महापौरप्रतिनिधी( प्रतिनिधी ) –   विद्यार्थ्‍यांच्‍या गुणवत्‍ता वाढीसाठी पालिकेचा शिक्षण विभाग आटोकाट प्रयत्‍न करित असून त्‍याचा उत्‍कृष्‍ठ नमुना म्‍हणजे आजचा हा कार्यक्रम असून या विद्यार्थ्‍यांची वैचारिक क्षमता वृंध्‍दीगत करण्‍यामध्‍ये शिक्षकांची महत्‍वपूर्ण भूमिका असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.
   बृहन्‍मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ‘शिष्‍यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ २०१८’ मास्‍टर दिनानाथ मंगेशकर नाटयगृह,  विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे आज मंगळवारी  संपन्‍न झाला,  त्‍यावेळी आयोजि‍त कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षण समिती सदस्‍य  सुरेंद्र सिंग,  उप आयुक्‍त (शिक्षण) मिलीन सावंत,  शिक्षणाधिकारी महेश पालकर,  उप शिक्षणाधिकारी तसेच गुणवंत विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
महापौर पुढे म्‍हणाले की, देशाची भावी पिढी घडविण्‍याचे काम शिक्षक प्रभावीपणे करित असल्‍याने ते कौतुकास पात्र असून शिक्षकांचा सन्‍मान हा राखलाच गेला पाहिजे असेही महापौर म्‍हणाले. त्‍याचप्रमाणे विद्यार्थ्‍यांमध्‍ये संभाषण कौशल्‍य,  वाचनाची आवड शिक्षकांनी अधिक वृंध्‍दीगत करावी जेणेकरुन पालिकेचे विद्यार्थीही स्‍पर्धा परिक्षेतून चांगल्‍या पदावर विराजमान होतील अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली. त्‍याचप्रमाणे विद्यार्थ्‍यांनीही वर्तमानकाळाचा विचार करुन स्‍पर्धात्‍मक परिक्षांची तयारी करण्‍यासाठी विविधांगी विषयांचे वाचन करावे अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली. तसेच चांगला माणूस म्‍हणून हे विद्यार्थी घडण्‍यासाठी शिक्षकांनी जरुर प्रयत्‍न करुन गुणवंत विद्यार्थी व त्‍यांच्‍या शिक्षकांचे शेवटी अभिनंदन केले  शिक्षण समिती सदस्‍य सुरेंद्रकुमार सिंह यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले शिक्षकांनी आपल्‍या कौशल्‍याने विद्यार्थ्‍यांना पैलू पाडून या परिक्षेची तयारी करुन घेतली असून पुरस्‍कार प्राप्‍त विद्यार्थी व शिक्षक अभिनंदनास पात्र असल्‍याचे ते म्‍हणाले. हे विद्यार्थी भविष्‍यात आणखी प्रगती करो अशी प्रार्थना त्‍यांनी यावेळी केली. उप आयुक्‍त (शिक्षण) मिलीन सावंत यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले  शिक्षकांच्‍या मेहनतीमुळे विद्यार्थ्‍यांना हे यश प्राप्‍त झाले असून गुणवंत विद्यार्थ्‍यांच्‍या शाळांनी केलेल्‍या तयारीचा पाठ इतर शाळांनी सुध्‍दा गिरवून भविष्‍यात उज्‍वल यश संपादन करावे अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली त्‍यासोबतच शिष्‍यवृत्‍ती परिक्षा ही स्‍पर्धा परिक्षेची पूर्वतयारी असून आजचे यश हे भविष्‍यातील स्‍पर्धा परिक्षेमध्‍ये  विद्यार्थ्‍यांना प्राविण्‍य प्राप्‍त करण्‍यासाठी प्रेरणा देणारी ठरेल अशी अपेक्षाही त्‍यांनी शेवटी व्‍यक्‍त केली.  शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकातून कार्यक्रमाचा आढावा घेतला. गतवर्षीच्‍या तुलनेत आज उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांची संख्‍या जास्‍त असून शिक्षकांनी आपला अति‍रिक्‍त वेळ दिल्‍यामुळेच हे शक्‍य झाल्‍याचे ते म्‍हणाले. या परिक्षेतील यशामुळे विद्यार्थ्‍यांमध्‍ये स्‍पर्धा परिक्षेचे बिज रोवले गेले असून गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे त्‍यांनी शेवटी अभिनंदन केले.
  शिष्‍यवृत्ती परिक्षेतील २०९ गुणवंताना महापौरांच्‍या हस्‍ते यावेळी गौरविण्‍यात आले. कार्यक्रमाचे संचालन शाळा निरिक्षक सुरेंद्र पावडे पाटील यांनी तर आभारप्रदर्शन उप शिक्षणाधिकारी प्रकाश चऱहाटे यांनी केले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget