रघुवंशी मिलमधील सुमारे २० हजार चौरस फुटांची अनधिकृत बांधकामे तोडली


दक्षिण मुंबईतील रघुवंशी मिल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाच्या 'जी / दक्षिण' विभागाची कारवाई
    मुंबई  ( प्रतिनिधी ) –  दक्षिण मुंबईतील सेनापती बापट मार्गावर रघुवंशी मिलचा भूखंड आहे. पालिकेच्या 'जी दक्षिण' विभाग कार्यक्षेत्रात असणा-या या ७.२ एकर आकाराच्या भूखंडावर काही अनधिकृत बांधकामे उद्भवली होती. पालिकेच्या नियम व पद्धतींनुसार या बांधकामांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने नोटीसेस बजावण्यात आल्या होत्या. या विरोधात संबंधितांनी  उच्च न्यायालयाकडे केलेली विनंती आज सोमवारी  खारिज करण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या 'जी दक्षिण' विभागाद्वारे आज धडक कारवाई करण्यात येऊन सुमारे २० हजार चौरस फुटांवरील ७ अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत, अशी माहिती 'जी दक्षिण' विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी दिली आहे.
पालिकेच्या 'जी दक्षिण' विभागाच्या कार्यक्षेत्रातील रघुवंशी मिल परिसरातील ७ अनधिकृत बांधकामांना नोटीसेस जारी करण्यात आल्यानंतर संबंधितांनी नगर दिवाणी न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला होता. सदर विनंती अर्ज आज सोमवारी खारिज करण्यात आला. ज्यानंतर संबंधितांद्वारे उच्च न्यायालयाकडे विनंती करण्यात आली होती. या अनुषंगाने उच्च न्यायालयात पालिकेद्वारे वरिष्ठ विधीज्ञ नरेंद्र वालावलकर यांनी पालिकेची बाजू मांडली. याप्रकरणी विधीज्ञ धर्मेश व्यास व पालिकेच्या सहाय्यक कायदा अधिकारी श्रीमती माधुरी मोरे, 'जी दक्षिण' विभागाचे पदनिर्देशित अधिकारी सुनिल तावडे यांनी वालावलकर यांना साहाय्य केले. यानुसार आज सोमवारी उच्च न्यायालयाने देखील संबंधितांचा विनंती अर्ज खारिज केला आहे.उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेच्या 'जी दक्षिण' विभागाद्वारे संबंधित अनधिकृत बांधकामांवर तात्काळ धडक कारवाई सुरु करण्यात आली. या धडक कारवाई दरम्यान संबंधित ७ अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. यामध्ये मे. लिटील नॅप (मे. पर्सेप्ट ऍडव्हर्टायझिंग लि.), दुर्गावती जयस्वार, ९९ पॅनकेक, मे. एव्हरलास्ट, मे. नातूझी, नातूझी कार्यालय (मे. रेनेसन्स पेंट्स), बाबुलाल बोहरा कार्यालय यांचा समावेश आहे. ही सर्व अनधिकृत बांधकामे १ ते ३ मजल्यांची आहेत.ही कारवाई करण्यासाठी पालिकेच्या 'जी दक्षिण' विभागाचे ३५ कामगार – कर्मचारी - अधिकारी देखील या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत सहभागी झाले होते. ही बांधकामे तोडण्यासाठी २ जेसीबी, २ डंपर, ३ गॅस कटर इत्यादी साधनसामुग्री वापरण्यात आली आहे, अशीही माहिती  देवेंद्रकुमार जैन यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget