सीएसआय आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पुढाकाराने ह्रदयविकाराच्‍या झटक्‍याबाबत आज जनजागृती मोहिम   मुंबई  ( प्रतिनिधी ) –  जागतिक ह्रदयदिनाच्‍या निमित्ताने ‘ कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया’ (सीएसआय) आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिका यांच्‍या पुढाकाराने ह्रदयविकाराच्‍या झटक्‍याला कसे सामोरे जावे याबाबत जनजागृती करण्‍यासाठी जनजागृती मोहिम उद्या शनिवार रोजी सकाळी ११.३० वाजता वरळी येथील नॅशनल स्‍पोर्टस क्‍लब ऑफ इंडिया येथे आयोजि‍त करण्‍यात आली आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्‍हणून सुप्रसिध्‍द सिने अभिनेत्री श्रीम. काजोल,  महापालिका आयुक्‍त अजोय मेहता,  मुंबई पोलिस आयुक्‍त सुबोध जयस्‍वाल यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
अचानकपणे आलेल्‍या ह्रदयविकाराच्‍या झटक्‍याला कसे सामोरे जावे  आणि तातडीने कोणते प्राथ‍मिक उपचार घावेत, याबाबत या मोहिमेत मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. कोणतेही पूर्वसूचना न देता अचानकपणे एखाद्या व्‍यक्तिला ह्रदयविकाराच्‍या झटका आल्‍यानंतर जवळ उपस्थित असलेल्‍या व्‍यक्ति  भांबावून जातात. वेळेत उपचार न मिळाल्‍याने  अनेकदा रुग्‍ण दगावण्‍याचाही घटना घडल्‍या आहेत. तेव्‍हा अश्‍या आपत्‍कालीन परिस्थितीमध्‍ये कोणते प्रथमोपचार करावेत याबाबत मार्गदर्शन या कार्यक्रमामध्‍ये केले जाणार आहे. या जनजागृती मोहिमेमध्‍ये पालिकेतंर्गत राबविण्‍यात येणाऱया कार्यक्रमांची माहिती पालिका आयुक्‍त अजोय मेहता, तर पोलिस प्रशासन ही मोहिम कशी राबविणार याची माहिती पोलिस आयुक्‍त सुबोध जयस्‍वाल प्रसार माध्‍यमांसमोर मांडणार आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget