पालिकेची उद्याने आता रोज १२ तास खुली राहणार


सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ दरम्यान खुली राहणार उद्याने
७५० उद्याने अधिक वेळ खुली ठेवण्याचा पालिका प्रशासनाचा सकारात्मक निर्णय
  मुंबई ( प्रतिनिधी ) –  'देशातील पालिकांमध्ये सर्वाधिक उद्यानांची चांगली देखभाल करणारी एक पालिका' असा लौकिक असणा-या बृहन्मुंबई महापालिकेची पालिका क्षेत्रात साधारणपणे ७५० उद्याने आहेत. या उद्यानांचा सकारात्मक परिणाम जसा पर्यावरणाच्या दृष्टीने आहे, तसाच तो आरोग्याच्या दृष्टीने देखील आहे. मात्र, पालिकेच्या उद्यान खात्याच्या अखत्यारितील उद्याने खुल्या राहण्याच्या वेळा या वेगवेगळ्या असल्याने नागरिकांची अनेकदा गैरसोय होत होती. तर काही उद्यानांची सायंकाळी बंद होण्याची वेळ ही ७ ते ८ च्या दरम्यानही होती. ज्यामुळे या उद्यानांचा मुंबईकर नागरिकांना म्हणावा तसा उपयोग होत नव्हता. या सर्व बाबी लक्षात घेऊन ही उद्याने सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९, यानुसार रोज १२ तास खुली ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत; अशी माहिती पालिकेचे उद्यान अधिक्षक  जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
विविध नागरी सेवा सुविधा देण्यात अग्रेसर असणा-या पालिकेच्या उद्यान खात्याद्वारे नागरिकांना उद्यान व खेळाच्या मैदानांची सुविधा देण्याचे नियोजन व व्यवस्थापन केले जाते. पालिकेच्या उद्यान खात्याच्या अखत्यारित साधारणपणे ७५० उद्याने आहेत. या उद्यानांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रविवार असो किंवा सार्वजनिक सुटी असो; आपल्या पालिकेच्या उद्यानांना मात्र कधीही सुटी नसते. ही उद्याने वर्षाचे सर्व ३६५ दिवस खुली असतात. मात्र, या उद्यानांच्या खुल्या राहण्याच्या वेळा आतापर्यंत वेगवेगळ्या होत्या.पालिकेच्या अखत्यारितील जागांचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग व्हावा, तसेच पालिका क्षेत्रातील सर्व उद्यानांच्या खुल्या राहण्याच्या वेळांमध्ये सुसूत्रता यावी; या हेतुने ही उद्याने रोज १२ तास खुली ठेवण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत. तसेच उद्यानांमध्ये आवश्यक असणारे दैनंदिन परिरक्षण हे दुपारी १२ ते ३ या कालावधीत प्राधान्याने करण्याचे आदेशही संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना देण्यात येत आहेत. त्याचबरोबर पालिका उद्यांनाच्या प्रवेशद्वारांवर सुधारित वेळांचे फलक तातडीने लावण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत, अशीही माहिती पालिकेचे उद्यान अधिक्षक  परदेशी यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget