म्हसळा पोलीस स्टेशनच्या गणरायाचे थाटात विसर्जन


म्हसळा
आॅन ड्युटी २४ तास जनतेच्या सुरक्षिततेचा वसा घेऊन काम करीत असलेल्या पोलिसांना स्वत:च्या घरच्या सणावाराला जाण्यापेक्षा कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी महत्त्वाची वाटते. मग, सणासुदीला घरी नसणाऱ्या पोलिसांची यावर उपाय म्हणून म्हसळा पोलीस स्टेशन येथे  बारा दिवसांचा गणेश उत्सव साजरा करण्याची मागील चार वर्षांची परंपरा आहे. या बारा दिवसाच्या उत्सवात पोलिसांचे कुटुंबीयदेखील  सहभागी होतात. सर्व पोलीस कर्मचारी वर्ग बारा दिवस बाप्पाची मनोभावाने पूजाअर्चा करतात. अशा या पोलीस स्टेशनच्या बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्थी झाल्यांनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज  पारंपरिक पद्धतीने म्हसळा एसटी स्टँड पासून टाळ मृदुगांच्या सुमधूर संगितात, खालू बाजाच्या गजरात म्हसळा येथील हिंगुलक रणी नदीवर थाटामाटात करण्यात आले. या विसर्जन मिरवणुकीत म्हसळा पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोल्हे यांचासह पोलीस कर्मचारी आणी त्यांचे कुटुंबीय खालू बाजाच्या तालावर नाचत होते. या विसर्जन प्रसंगी शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget