सर्वेाच्च न्यायालयाद्वारे बांधकाम परवानग्यांना २३ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ


  मुंबई ( प्रतिनिधी ) –  सर्वेाच्च न्यायालयाद्वारे आज एका विशेष सुनावणी दरम्यान देण्यात आलेल्या आदेशांनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नवीन बांधकाम परवानग्यांवर असलेल्या बंदीवरील स्थगितीस २३ ऑक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने पालिका क्षेत्रातील घनकचरा सुव्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर नवीन बांधकाम परवानग्या देण्यास बंदी घातली होती. याबाबत एका संस्थेद्वारे सर्वेाच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत सर्वेाच्च न्यायालयाने आज बुधवारी आदेश देताना सदर बांधकाम बंदीला पुढील सुनावणी पर्यंत म्हणजेच  २३ ऑक्टोबर २०१८ पर्यंत स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली आहे.
सर्वेाच्च न्यायालयाद्वारे आज देण्यात आलेल्या आदेशांबाबत अधिक माहिती देताना शंकरवार यांनी सांगितले बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील घनकचरा सुव्यवस्थापनाच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील नवीन बांधकामांना परवानगी देण्याबाबत २९ फेब्रुवारी २०१६ रोजी उच्च न्यायालयाद्वारे बंदी घालण्याचे आदेशित करण्यात आले होते. या बंदीबाबत एका संस्थेद्वारे  सर्वेाच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.  सर्वेाच्च न्यायालयाने याबाबत १५ मार्च २०१८ रोजी बांधकाम बंदी आदेश ६ महिने उठविण्याचे निर्देश दिले होते. सदर ६ महिन्यांची मुदत १५ सप्टेंबर २०१८ रोजी संपल्यानंतर ही बंदी पुन्हा लागु झाली होती. याबाबत आज सर्वेाच्च न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर २०१८ रोजी घेण्याचे आदेश देतानाच, तोपर्यंत म्हणजेच २३ ऑक्टोबर २०१८ पर्यंत बांधकाम बंदी वरील स्थगितीला मुदतवाढ दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget