वर्सेावा चौपाटीच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक 'बीच क्लिनींग मशीन'


   मुंबई ( प्रतिनिधी ) –  पालिका क्षेत्राच्या स्वच्छतेसाठी दिवस रात्र कार्यरत असणा-या पालिकेद्वारे सुप्रसिद्ध वर्सेावा चौपाटीची देखील साफसफाई दिवस रात्र पद्धतीने दररोज केली जाते. या अनुषंगाने वर्सेावा चौपाटीच्या साफसफाईसाठी संस्था निवडीकरीता राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा कार्यादेश नुकताच देण्यात आला आहे. त्यानुसार निवड झालेल्या संस्थेद्वारे वर्सेावा चौपाटीच्या साफसफाईचे काम सुरु झाले आहे. सदर संस्थेद्वारे या कामासाठी १ अत्याधुनिक 'बीच क्लिनींग मशीन' लवकरच आयात करण्यात येणार असून सध्या १२० कामगारांद्वारे वर्सेावा चौपाटीची साफसफाई करण्यात येत आहे. या निविदा प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे या निविदा प्रक्रियेत पावसाळ्याच्या साफसफाईच्या दृष्टीने पावसाळ्याचे ४ महिने व उर्वरित ८ महिने यांचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  विश्वास शंकरवार यांनी दिली आहे.
पालिका क्षेत्रातील सागरी किना-यालगत असणा-या व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या चौपाट्यांची साफसफाई पालिकेद्वारेच दैनंदिन स्वरुपात नियमितपणे केली जाते. या अंतर्गत भरतीच्या दरम्यान समुद्राच्या लाटांबरोबर वाहून येणा-या कच-याची आणि चौपाटीवर उद्भवणा-या इतर कच-याची साफसफाई केली जाते. यानुसार वर्सेावा चौपाटीच्या साफसफाईसाठी निविदा प्रक्रियेअंती निवड झालेल्या संस्थेद्वारे साफसफाईची कार्यवाही नुकतीच सुरु झाली आहे. वर्सेावा चौपाटीची एकत्रित लांबी ही सुमारे ४.५ किलोमीटर असून रुंदी ही सुमारे ३५ ते ६० मीटर या दरम्यान आहे. वर्सेावा चौपाटीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे २ लाख ३२ हजार ५०० चौरस मीटर एवढे आहे.पालिकेच्या 'के पश्चिम' विभागांतर्गत येणा-या वर्सेावा चौपाटीवर पावसाळ्याच्या काळात दररोज सरासरी १३० मेट्रीक टन एवढ्या कच-याची सफाई केली जाते. तर पावसाळ्या व्यतिरिक्तच्या ८ महिन्यात ही सरासरी दररोज सुमारे ४५ मेट्रीक टन एवढी असते. हे लक्षात घेऊन या वेळेच्या निविदा प्रक्रियेत पावसाळ्या दरम्यानची साफसफाई व पावसाळ्या व्यतिरिक्त इतर कालावधीत करण्यात येणारी साफसफाई याचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. यानुसार पावसाळ्याच्या काळात वर्सेावा चौपाटीवर दररोज किमान १०० कामगारांनी साफसफाई करणे अपेक्षित आहे. तर उर्वरित ८ महिन्यांच्या कालावधीत दररोज ५० कामगारांनी काम करणे आवश्यक आहे. तसेच 'बीच क्लिनींग मशीन'द्वारे साफसफाई करण्याची प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे झाली नसल्यास सदर दिवशी अतिरिक्त २० कामगार नेमणे आवश्यक असणार आहे. निविदा प्रक्रियेअंती निवड झालेल्या संस्थेने पुढील ६ वर्षे वर्सेावा चौपाटीची साफसफाई ही दैनंदिन स्वरुपात नियमितपणे करणे अपेक्षित असून यासाठी पालिकेला रुपये २२.२४ कोटी एवढा खर्च अंदाजित आहे.
निविदा प्रक्रियेअंती 'स्पेक्ट्रम इंजिनिअर्स प्रा. लि.' या संस्थेची निवड झाली असून त्यांना कार्यादेश देण्यात आला आहे. कार्यादेश दिल्यानंतर सदर संस्थेने वर्सेावा चौपाटीच्या साफसफाईचे काम लगेचच सुरु केले आहे. तथापि, यासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक यंत्रसामुग्री आयात करुन कार्यान्वित करुन घेण्यासाठी आणि निविदेतील अटी व शर्तींनुसार पूणर्ण क्षमतेने काम सुरु करण्यासाठी पालिकेच्या नियम व पद्धतींनुसार सदर संस्थेला ४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. अत्याधुनिक 'बीच क्लींनीग मशीन' व्यतिरिक्त २ कॉम्पॅक्टर, २ ट्रॅक्टर इत्यादींसह आवश्यक ते साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करुन घेणेही आवश्यक आहे, अशीही माहिती शंकरवार यांनी दिली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget