हुतात्मा कै नाग्या कातकरी यांची दप्तरी नोंद करण्याची मागणी


सुधागड
 जंगल वाचवा सत्याग्रहामध्ये हुतात्मा झालेले क्रांतिकारी कै. नाग्या महादू कातकरी यांच्या ८९व्या पुण्यतिथीनिमित्त नुकतेच भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अक्कादेवीच्या डोंगरावर झालेल्या जंगल सत्याग्रहावेळी गोळीबार चालू असताना बळी पडलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रॅलीचे आयोजन  .व पारंपरिक आदिवासी गाणी व  नृत्य  करन्यात आले.

यावेळी ठाणाले आदिवासी वाडी ते ठाणाले गाव ,नाडसुर आदिवासीवाडी, भैरमपाडा आदिवासीवाडी ,धोंडसे आदिवासीवाडी अशी  भव्य रॅली व मोटार  सायकल  रँली काढण्यात आली.   यावेळी  नाडसुर ग्रामपंचायत सरपंच उज्वला पवार , उपसरपंच संदेश  शेवाळे, सुरेखा दळवी, युवराज मोहीते, करिष्मा मँडम, भिवा पवार अंकुश जाधव, संदिप पवार, गोपीनाथ कातकरी , संजय वाघमारे , एकनाथ वाघमारे , लहु पवार, करन पवार , पदाधिकारी तसेच सदस्य व आदिवासी  बांधव आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांची दप्तरी नोंद व्हावी  अशी जोरदार मागणी सर्व अदिवासी  संघटनांनी केली आहे. तसेच नाग्या महादू कातकरी यांची पुण्यतिथी पार  पडल्याने तालुक्यात प्रशासन खडबडून जागे झाले आहे.,
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget