परवानगी नसलेल्या गणेश मंडपांवर पालिका कारवाई करणारचमुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – मुंबईसह सवॅकडे लाडक्या गणपती बाप्पाचे वारे मोठ्या प्रमाणात वाजू लागले असतानाच पालिका प्रशासनाने  तांत्रिक कारणाने मंडपाची परवानगी नाकारण्यात आलेल्या मंडळांनी बेकायदेशीर मंडप उभारल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या उत्सवात बेकायदेशीर मंडप उभारण्यास त्यांच्यावर कारवाई केली तर संघषॅ  पेटण्याची शक्यता वतॅवली जात आहे अवघ्या दोन दिवसांनंतर सुरु होणा-या गणेशोत्सवासाठी 281 मंडळांपुढे आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशभक्त गणेश उत्सवात जोमाने कामाला लागले आहेत ही गणेशोत्सव अवघ्या दोन  दिवसांवर आला असताना अजूनही २८१ मंडळांनी अटींची पूर्तता न केल्याने पालिका प्रशासनाने मंडपासाठी परवानगी दिलेली नाही. रस्त्यावर मंडप उभारताना न्यायालयाच्या आदेशानुसार अटी, शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे.  शिवाय पालिका, अग्निशमन दल व  वाहतुकीचे नियम अशा अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. मात्र संबंधित मंडळांनी अर्ज भरताना आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता न केल्याने पालिका प्रशासनाने अशा मंडळांना मंडपासाठी परवानगी नाकारली आहे. याबाबत तोगडा काढण्यासाठी सोमवारी महापौरांसोबत प्रशासन व गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीला पालिका आयुक्त अजोय मेहताही उपस्थित होते. यावेळी मंडपासाठी ऑपलाईन परवानगी द्या व परवानगीबाबतचा तोडगा काढा अशी मागणी समितीने प्रशासनाकडे केली. मात्र याबाबत येत्या 12 सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी आहे.  शिवाय न्यायालयाचे आदेश असल्याने बेकायदा मंडपांसाठी परवानगी देता येणार नाही, बेकायदा मंडप उभारल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दोन दिवसानंतर गणेशोत्सवाची धामधूम सुरु होणार आहे. असे असताना परवानगी नाकारणालेले सार्वजनिक मंडळ मंडप उभारण्याबाबत काय भूमिका घेणार यांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मंडपासाठी न्यायालयाचे आदेश व सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन दल व वाहतूक पोलिसांच्या अटी, शर्तींची अंमलबजावणी करणे गणेशोत्सव मंडऴाना बंधनकारक आहे. मात्र या अटींची पूर्तता केलेली नसल्यामुळे 281 मंडळांना परवानगी नाकारण्यात आली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे          

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget