गणपती बाप्पा घरोघरी विराजमान, तर भक्तीभावाने भक्तगण करतात पूजाअर्चा


खोपोली:
रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट, सुगंधी - धुप अगरबत्यांचा दरवळ, मंगलमयी वाद्यांची सुरावट आणि लक्ष वेधून घेणारी आरास अशा प्रसन्नशील चैतन्यदायी वातावरणात आज घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन झाल्याने सर्वत्र ठिकाणी आनंदाचे वातावरण दरवळ आहे. तर प्राणप्रतिष्ठापनेसाठी दुपारी दीडपर्यंत उत्तम मुहूर्त असल्याचे तज्ञानकडून सांगण्यात आल्याने दीडपर्यत सर्वांनी आपल्या बाप्पाची भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा केली.

महागाई, इंधन दरवाढ हे सारं विसरून प्रत्येकाला बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेचे वेध लागले होते. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अनेक गणेशभक्तांनी बुधवारी बाप्पांना आपल्या घरी आणले, तर काही गणेशभक्तआज गुरुवारी बाप्पांचे घरी स्वागत केले.

शहरातील प्रमुख मंडळाची तयारीही पूर्ण झालीय.खोपोलीसह राज्यभरात आता दहा दिवस फक्त आणि फक्त गणरायाचे दिवस असणार आहेत.

गणरायाच्या मकाराची सजावटीतून अनेकांनी समाजाला वेगवेगळे संदेश दिले असून खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील केळवली गावामधील एका भक्ताने पाणी आडवा पाणी जिरवा, वाहन चालवताना हेल्मेट वापरा तसेच गतीवर नियंत्रण ठेवा, स्त्री
ला समाजात अभिमानस्पद वागणूक द्या, झाडे लावाझाडे जगवा, स्त्री भूण हत्या टाळा असे संदेश देवून समाजापुढे आर्दश निर्माण केला आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget