पालिकेतील जुन्या फायलींच्या स्कॅनिंगचे काम एकदम धिम्यागतीने पालिका र-थायी समितीत चांगलेच पडसाद

पालिकेतील जुन्या फायलींच्या स्कॅनिंगचे काम एकदम  धिम्यागतीने पालिका र-थायी समितीत चांगलेच पडसाद
दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका  सदस्यांची मागणी
मुंबई ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबई  पालिकेतील जुन्या फाईलींचे स्कॅनिक करण्याच्या कामाची प्रक्रिया अद्याप धिम्यागतीने सुरु असल्या प्रकरणी आज मंगळवारी पालिका र-थायी समितीत चांगलेच पडसाद उमटले सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर धरत
पालिकेत डीजीटलच्या नावाखाली कंत्राटदाराकडून चक्क लूटमार केली जात आहे असा आरोप करत  अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, अशी जोरदार मागणी सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.
  मुंबई पालिका ही देशात सर्वात मोठी पालिका गणली जात या पालिकेचा कामाचा गाडा मोठा आहे सुमारे एक लाख 11 हजार कमॅचारी काम करित आहेत आतापर्यंत 60 टक्के फायलींचे स्कॅनिंग झाले आहे. फाईलींचे स्कॅनिंग करून त्यातील संपूर्ण माहिती संगणकावर नोंद केली जाणार होती. मात्र हे काम हे काम एकदम धिम्यागतीने सुरु आहे पालिकेतील जुन्या फायलींचा ढिगारा असल्याने अशा फायलींमधून माहिती शोधणे कठीण होत आहे त्यामुळे या सर्व फायलींचे स्कॅनिंग करून त्यातील माहिती संगणकावर फिड करण्याचे कंत्राट 2014 साली देण्यात आले. हे काम 2019 पर्यंत पूर्ण होणे आवश्‍यक आहे. मात्र अजूनही 40 टक्के काम अपूर्ण असून ही प्रक्रिया अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे. याबाबत कंत्राटदाराला तब्बल सहा वेळा नोटिस देऊन समज देण्यात आली, मात्र तरीही कामाचा वेग वाढलेला नाही. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिकेत डिजीटलच्या नावावर घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोपही यावेळी केला. विशेष म्हणजे प्रशासनाने 2015 साली जुन्या फायलींचे स्कॅनिंग आणि डिजीटल करण्याच्या कामासाठी तब्बल 63 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. यांमध्ये विकास नियोजन आणि इतर विभागातील फायलींच्या 80 कोटी पानांचे स्कॅन अशा प्रकारे 72 विभागांतील फायलींचे स्कॅन करून त्याचे डिजीटल केले जाणार होते. मात्र कंत्राटदाराने हलगर्जीपणा करीत ही प्रक्रिया रखडवली आहे. सहावेळा नोटिस पाठवून केलेल्या सूचनांकडेही दुर्लक्ष केल्याने या कामांत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असून अशा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही नगरसेवकांनी लावून धरली आहे. सपाचे गटनेते रईस शेख यांनी आज स्थायी समितीत या विषयाकडे लक्ष वेधले यावर आता पालिका प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget