सामाजिक समता प्रस्‍थापित होण्‍यामध्‍ये अण्‍णाभाऊ साठेंचे महत्‍वपूर्ण योगदान – महापौर


सामाजिक समता प्रस्‍थापित होण्‍यामध्‍ये अण्‍णाभाऊ साठेंचे महत्‍वपूर्ण योगदान  – महापौर
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९८ वी जयंती पालिकेत साजरी

 मुंबई ( प्रतिनिधी ) –   अण्णाभाऊ साठे यांनी जात – पात बाजूला ठेवून मनुष्‍य हा मनुष्‍य म्‍हणून जगला पाहिजे,  सर्वांना समान अधिकार मिळाला पाहिजे यासाठी लढा देऊन सामाजिक समता प्रस्‍थापित होण्‍यासाठी आपले संपूर्ण आयुष्‍य खर्ची घालून महत्‍वपूर्ण योगदान दिले असे प्रति‍पादन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.
साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या ९८ व्‍या जयंतीनिमित्त सुमन नगरमधील अण्‍णाभाऊ साठे उद्यानामधील अण्‍णाभाऊ साठेंच्‍या पुतळयास महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी आज मंगळवारी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले, त्‍यानंतर आयोजित सभेत नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी उप मुख्‍यमंत्री तथा आमदार  छगन भुजबळ, मुंबई राष्‍ट्रवादी पक्षाचे अध्‍यक्ष सचिन अहिर,  माजी खासदार एकनाथ गायकवाड,  आमदार मंगेश कुडाळकर,  माजी आमदार नवाब मलिक,  सहकारमहर्षि शिवाजीराव नलावडे,  राष्‍ट्रवादी पक्षाच्‍या पालिकेतील गटनेत्‍या स्‍थानिक नगरसेविका श्रीम. आशा मराठे,  नगरसेवक सर्वश्री. श्रीकांत शेटये  व महादेव शिवगण,  माजी नगरसेवक रविंद्र पवार हे मान्‍यवर उपस्थित होते महापौर  म्‍हणाले अण्णाभाऊ साठे यांनी वंचि‍त,  दुर्बल,  मागासवर्गीय यांच्‍यावर अन्‍याय होऊ म्‍हणून आपल्‍या लेखनी व वाणीतून प्रचंड  अश्‍या साहित्‍यांची निर्मिती करुन गोरगरीबांची व्‍यथा व वेदना समाजासमोर मांडली. उपेक्षित,  कष्‍टकरी  समाजाकडे लक्ष देऊन एक सामाजिक चळवळ उभी करण्‍यामध्ये त्‍यांचे योगदान मोठे असल्‍याचे महापौरांनी सांगितल माजी उप मुख्‍यमंत्री तथा आमदार छगन भुजबळ यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले अण्‍णाभाऊ साठे हे प्रचंड हलाखीत मोठे झाले. तसेच त्‍यांनी अजरामर असे साहित्‍य निर्माण केले तसेच गिरणी कामगारांचे लढे उभे केले. त्‍यासोबतच मुंबई महाराष्‍ट्राला मिळाली पाहिजे यासाठी लेखणी व वाणी झिजविली. अण्‍णाभाऊ यांचे साहित्‍य रशियन भाषेत भाषांतरित झाले, त्‍यांची जिद्द ही सर्वांनी लक्षात घेऊन प्रत्‍येकांनी ती आचरणात आणली पाहिजे,  असेही ते म्‍हणाले. माजी खासदार एकनाथ गायकवाड यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले  अण्‍णाभाऊ यांनी आपल्‍या संपूर्ण आयुष्‍यात माणसे जोडली व ही जोडलेली माणसे चांगली जगली पाहिजे यासाठी लढा दिला, त्‍यांच्‍या विचारांनी पेटून उठून त्‍यांचे कार्य पुढे नेण्‍यासाठी सर्वांनी झटले पाहिजे असेही ते म्‍हणाले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget