२७,२८४ चौ.मी.चा भूखंड पालिकेकडे वर्ग करण्याविरोधातील याचिका रद्दबातल

२७,२८४ चौ.मी.चा भूखंड पालिकेकडे वर्ग करण्याविरोधातील याचिका रद्दबातल

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाजवळील भूखंड प्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश

उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या विस्तारीकरणासाठी सकारात्मक

    मुंबई ( प्रतिनिधी ) – 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' परिसरालगत असणारा २७ हजार २८४.३६ चौरस मीटर आकाराचा भूखंड आहे. याच भूखंडावर उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्याची पालिकेची योजना आहे. हा भूखंड मुंबई शहर जिल्हाच्या जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशांनुसार ७ जानेवारी २०१७ रोजी पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. तथापि, या हस्तांतरणाविरोधात 'मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड' यांनी उच्च न्यायालयाकडे विनंती याचिका दाखल केली होती. याबाबत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व  न्यायमूर्ती श्रीमती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने सदर याचिका रद्दबातल करण्याचे आदेश आज दिले आहेत, अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.

पालिकेच्या 'ई' विभाग कार्यक्षेत्रात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीचा बाग) आहे. या उद्यानालगत सुमारे ५४ हजार ५६८.७२ चौरस मीटर आकाराचा भूखंड आहे. माझगाव विभागातील सीएस ५९३ क्रमांकाचा हा भूखंड मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने देण्यात आला होता. याबाबत महाराष्ट्र शासनाद्वारे वर्ष २००४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेआधारे व सदर भाडेपट्ट्याचा कालावधी वर्ष २०१७ मध्ये संपल्यानंतर; मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांद्वारे सदर भूखंडाच्या निम्मा (५० टक्के) म्हणजेच २७ हजार २८४.३६ चौरस मीटर एवढ्या आकाराचा भूभाग पालिकेकडे वर्ग करण्यात आला होता. तथापि, पालिकेकडे भूभाग हस्तांतरित करण्याविरोधात मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी उच्च न्यायालयात विनंती याचिका दाखल केली होती. याबाबत उच्च न्यायालयाने सदर याचिका रद्दबातल करण्याचे आदेश आज दिले आहेत. यामुळे पालिकेच्या उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या विस्तारीकरणास अधिक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असेही दराडे यांनी नमूद केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget