पदपथांवरील अनधिकृत ६९ होर्डिंगसह ६३ आधारखांब देखील हटविले

पदपथांवरील अनधिकृत ६९ होर्डिंगसह ६३ आधारखांब देखील हटविले
होर्डिेंग, आधारखांब निष्कासनाचा खर्च संबंधितांकडून वसूल करणार
अंधेरी परिसरात पालिकेच्या 'के पश्चिम' विभागाची धडक कारवाई

   मुंबई ( प्रतिनिधी ) –  पालिकेच्या 'के पश्चिम' परिसरातील पदपथांवर, रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या होर्डिंगवर आणि होर्डिंग लावण्यासाठी उभारण्यात आलेल्या आधारखांबांवर धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत आतापर्यंत ६९ होर्डिंग आणि ६३ आधारखांब हटविण्यात आले आहेत. परिमंडळ – ४ चे उपायुक्त  किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या या कारवाई अंतर्गत रस्ते, पदपथ यासह सार्वजनिक परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज, फलक इत्यादी मोठ्या प्रमाणात हटविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या निष्कासन कारवाईसाठी पालिकेला आलेल्या खर्चाची संबंधितांकडून वसूली करण्याची कार्यवाही देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती, 'के पश्चिम' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

पालिकेच्या 'के पश्चिम' विभागांतर्गत जुहू, जोगेश्वरी (प.), अंधेरी (प.), विलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा, ओशीवरा, वर्सेावा व वर्सेावा समुद्र किनारा इत्यादी परिसरांचा समावेश होतो. 'के पश्चिम' विभागातील याच परिसरांतील रस्त्यांवर, पदपथांवर व सार्वजनिक परिसरांमध्ये अनधिकृतपणे होर्डिंग्ज, पोस्टर, फलक इत्यादी लावण्यात आले होते. अनेक ठिकाणी तर फलक लावण्यासाठी आधारखांबही अनधिकृतपणे उभारण्यात आले होते. यामुळे अनेक ठिकाणी पादचा-यांना आवागमन करण्यास अडथळा येत होता. या सर्व बाबी लक्षात घेत 'के पश्चिम' विभागातील अनधिकृत फलकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत आतापर्यंत ६९ फलक व ६३ आधारखांब हटविण्यात आले आहेत. तसेच अनधिकृत फलकांविरोधातील ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार आहे, अशीही माहिती प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget