अंधेरी पश्चिम परिसरातील ६५ अनधिकृत दुकाने तोडली


अंधेरी पश्चिम परिसरातील ६५ अनधिकृत दुकाने तोडली
जयप्रकाश मार्गावरील अतिक्रमणे हटविल्याने वाहतूक होणार सुरळीत मुंबई पोलीसांच्या सहकार्याने पालिकेच्या 'के पश्चिम' विभागाची धडक कारवाई
मुंबई  ( प्रतिनिधी ) –   पालिका क्षेत्रातील अंधेरी स्टेशनाच्या पश्चिमेकडून वर्सेाव्याकडे जाणारा जयप्रकाश मार्ग आहे. याचा मार्गाच्या पदपथांवर ६५ व्यवसायिक स्वरुपाची अनधिकृत अतिक्रमणे उद्भवली होती. या अतिक्रमणांमुळे पादचा-यांना पदपथांऐवजी रस्त्यांवरुन चालावे लागत होते. ज्यामुळे पादचा-यांना संभाव्य धोका उद्भवू शकण्यासह वाहतूकीला देखील अडथळा येत होता. हे लक्षात घेऊन पदपथावर असलेल्या या ६५ व्यवसायिक स्वरुपाच्या अनधिकृत बांधकामांवर / अतिक्रमणांवर मुंबई पोलीसांच्या मदतीने धडक कारवाई करुन ६५ दुकाने आज बुधवारी करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान हटविण्यात आली आहेत. परिमंडळ – ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जयप्रकाश मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती 'के पश्चिम' विभागाचे सहाय्यक आयुक्त  प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
पालिकेच्या 'के पश्चिम' विभागांतर्गत जुहू, जोगेश्वरी (प.), अंधेरी (प.), विलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा, ओशीवरा, वर्सेावा व वर्सेावा समुद्र किनारा इत्यादी परिसरांसह अंधेरी स्टेशनच्या पश्चिमेकडून वर्सेाव्याकडे जाणा-या जयप्रकाश मार्गाचाही यात समावेश होतो. हा रस्ता स्टेशनजवळील असल्यामुळे या रस्त्यावर अधिक वर्दळ असणेही स्वाभाविक आहे. मात्र या रस्त्याच्या पदपथांवर उद्भवलेल्या अतिक्रमणांमुळे पादचा-यांना तकलिफ होण्यासह वाहतूकीला अडथळाही होत होता. हे लक्षात घेऊनच मुंबई पोलीस दलाच्या विशेष सहकार्याने ही अतिक्रमण निर्मूलन कारवाई आज यशस्वीपणे करण्यात आली. या कारवाई दरम्यान मुंबई पोलीस दलाच्या २० कर्मचा-यांचा ताफा या कारवाईदरम्यान घटनास्थळी तैनात होता. या कार्यवाहीसाठी १ जेसीबी, ३ लॉरी व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली. या कारवाईत पालिकेचे २५ कामगार – कर्मचारी - अधिकारी सहभागी झाले होते, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget