सहकार नगर वसाहतीमधील इमारतींचे तातडीने बांधकाम संरचनात्‍मक परिक्षण करा– महापौर


सहकार नगरमधील इमारतींची महापौरांनी केली पाहणी
      मुंबई  ( प्रतिनिधी ) –   वडाळाच्‍या सहकार नगर वसाहतीमधील काही इमारतींचे स्‍लॅब कोसळत असून भविष्‍यात कोणत्‍याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी संबंधित अधिकारी यांनी या धोकादायक इमारतींचे तातडीने बांधकाम संरचनात्‍मक परिक्षण (स्‍ट्रॅक्‍चरल ऑडीट) करुन घ्‍यावे,  असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.
वडाळाच्‍या नायगांव क्रॉस मार्गावरील सहकार नगर वसाहतीतील महापालिका भाडेकरुंच्‍या इमारतींची महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी आज बुधवारी  दुपारी पालिका अधिकाऱयांसमवेत पाहणी केली,  त्‍यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी खासदार राहूल शेवाळे, माजी महापौर तथा नगरसेविका श्रीम.श्रध्‍दा जाधव नगरसेवक अमेय घोले,  माजी नगरसेवक तसेच संबंधित पालिका अधिकारी उपस्थित होते. महापौर म्‍हणाले या वसाहतींमध्‍ये एकूण ४९ इमारती असून यापैकी ज्‍या इमारतींची दुरुस्‍ती अद्यापर्यंतही झाली नाही अश्‍या सर्वच तसेच ज्‍यांची यापूर्वी दुरुस्‍ती  झाली आहे परंतु त्‍या इमारतींमध्‍ये सुध्‍दा स्‍लॅब कोसळण्‍याचे प्रकार होत असेल तर या सर्व  इमारतींचे तातडीने बांधकाम संरचनात्‍मक परिक्षण करुन तातडीने अहवाल सादर करावा,  जेणेकरुन या इमारतींच्‍या दुरुस्‍ती कामाला तातडीने प्रारंभ होऊन येथील नागरिकांना दिलासा मिळेल असेही महापौर म्‍हणाले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget