कमलाकारी तर्‍हा

कमलाकारी दागिन्यांची ज्वेलरी


साक्षी तावडे (प्रतिनिधी)
आपण नेहमी वेगवेगळ्या गोष्टींच्या शोधात असतो खास करुन मुलींना आपल्या नेहमीच्या वापरातल्या दागिण्यांमध्ये नाजूक आणि रेखीव नाहीतर जड नक्षीकाम असलेले दागिने आवडतात. मात्र आता दागिण्यांमध्ये एक नवीन प्रकार आलेला आपल्या ला पाहण्यास मिळेल तो म्हणजे "कमलाकारी ज्वेलरी" असा . हे दागिने कापडापासून बनलेले असतात. ते वापरण्यासाठी अगदी हलके व कधीही लगेच तुटतील असे नसतात.
या दागिण्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे दागिने अगदी आपण कुर्तापासून , साडी ते कुठल्याही शोभेल अशा वेस्टर्न कपड्यावर खुलून  दिसतात . हे दागिने बघायला जितके सुंदर दिसतात तितकेच ते स्वतः घरच्या घरी बनवण्यासही सोपे आहे त्याचे बरेचसे व्हिडिओ ' युट्यूब वर उपलब्ध आहेत .
"तेजस्विनी पंडित" तसेच "अभिज्ञा भावे" या दोन अभिनेत्रीनी देखील त्याच्या "तेजाज्ञा" या इनस्टाग्राम पेज शर वेगवेगळ्या तर्‍हेचे कमलाकारी दागिने खरेदीकारांसाठी उपलब्ध केलेले दिसतात आणि या दागिण्यांना तेवढीच झपाट्याने पंसती मिळताना दिसते आहे . 'जन्क' ज्वेलरीच्या पाठोपाठ ही कमलाकारी ज्वेलरी सध्या खूप भाव खाऊन जाते आहे .
बाजारात तीची किंमत 200 ते 300 रुपयांपासून सुरु होते आणि या दागिण्यांमध्ये अगदी कानातले , नेकलेस , बांगड्या यांचा समावेश झालेला दिसून येतो . 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget