विना परवानगी एकही मंडप आपल्या कार्यक्षेत्रात उभा राहणार नाही याची विशेष काळजी घ्या - पालिका आयुक्त

विना परवानगी एकही मंडप आपल्या कार्यक्षेत्रात उभा राहणार नाही याची विशेष काळजी घ्या - पालिका आयुक्त


मुंबई  ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील गणेश उत्सवासाठी पालिका प्रशासन कामाला लागली आहे मुंबईत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंडपविषयक परवानग्या द्याव्यात, मंडपाच्या परवानगीसाठी आलेला एकही अर्ज प्रलंबित ठेवू नका तसेच विना परवानगी एकही मंडप आपल्या कार्यक्षेत्रात उभा राहणार नाही, याची विशेष काळजी घ्या, असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व सहायक पालिका आयुक्तांना आज शनिवारी दिले आहेत.

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो या उत्सवासाठी पालिकेनेही जय्यत तयारी सुरू केली आहे मंडळांना काय काय लागणा-या सेवा सुविधा पुरवण्यासाठी पालिका प्रशासन कामाला लागली आहे पालिका आयुक्त मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवारी पालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, तसेच संबधित अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव मंडपाच्या परवानगीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपाच्या परवानग्या उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार दिल्या जात आहेत. ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांवर निर्धारित वेळेत कार्यवाही करून मंजुरी द्यावी, अर्जांमध्ये त्रुटी असल्यास त्या बाबी स्पष्टपणे नमूद करून अर्ज फेटाळावा, अर्ज फेटाळण्याची कारणे संबंधितांना कळवावीत, कुठलाही अर्ज प्रलंबित ठेऊ नये, असे आदेश आयुक्तांनी सर्व विभागांतील सहायक आयुक्तांना दिले आहेत.

नियमांचे कठोरपणे पालन करा  - पालिका आयुक्त

विना परवानगी एकही मंडप आपल्या कार्यक्षेत्रात उभा राहणार नाही, याची विशेष काळजी घ्या, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी इत्यादींसारख्या श्रीगणेश मूर्ती विसर्जनाच्या महत्त्वाच्या ठिकाणी परदेशी पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. मंडळांनी मंडप व प्रवेशद्वाराची उभारणी व अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, मुंबईत मोनो मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे एमएमआरडीए तसेच पोलिसांशी समन्वय साधावा, असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget