पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३ ठिकाणी कूपर रुग्णालयाद्वारे वैद्यकीय सेवा डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातही देता येणार वैद्यकीय सेवा पालघर जिल्हा आरोग्य विभागाच्या सहकार्याने कूपर रुग्णालयाचा उपक्रम


पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३ ठिकाणी कूपर रुग्णालयाद्वारे वैद्यकीय सेवा
डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातही देता येणार वैद्यकीय सेवा
पालघर जिल्हा आरोग्य विभागाच्या सहकार्याने कूपर रुग्णालयाचा उपक्रम

  मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) –   मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडिया' च्या नियमांनुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे किंवा अस्तित्वात असलेल्या आरोग्य केंद्रांची संलग्नता घेणे आवश्यक आहे. यानुसार 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर पालिका सर्वेापचार रुग्णालय' येथील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा सुविधांच्या अनुषंगाने प्रशिक्षण मिळावे, याकरिता पालघर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेली तीन आरोग्य केंद्रांसोबत संयुक्त कार्यक्रमास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सदर आरोग्य केंद्राच्या ग्रामीण परिसरातील नागरिकांना पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय तज्ज्ञांची सेवा उपलब्ध होणार आहे. तर पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक असणारा ग्रामीण भागततील वैद्यकीय सेवेचा अनुभव घेणे सुलभ होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी दिली आहे.
या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना या उपक्रमाचे प्रमुख समन्वयक तथा जनऔषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले  'मेडीकल कॉन्सिल ऑफ इंडिया' च्या नियमांनुसार एम.बी.बी.एस. पदवीच्या विद्यार्थ्यांना एक वर्ष इंटर्नशिप (आंतरवासिता प्रशिक्षण) पूर्ण करणे बंधनकारक आहे. या एक वर्षापैकी सहा महिन्यांची सेवा ही ग्रामीण भागात देणे ही नियमानुसार बंधनकारक आहे. यासाठी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला ग्रामीण भागात तीन ठिकाणी आरोग्य केंद्र उभारणे बंधनकारक आहे. तथापि, शासकीय व निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संलग्नता घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायानुसार पालघर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारितील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची संलग्नता पालिकेच्या 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर महापालिका सर्वेापचार रुग्णालय' येथील विद्यार्थ्यांसाठी पालघर जिल्ह्यातील घेण्यात आली आहे.
पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागातील पदवी, पदव्युत्तर व इंटर्नशिप (आंतरवासिता प्रशिक्षण) करणा-या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पालघर जिल्ह्यातील कामन, केळवे व सातपाठी येथे पाठविले जाणार आहे. या तिन्ही ठिकाणी एकावेळी १६ विद्यार्थ्यांना इंटर्नशिप (आंतरवासिता प्रशिक्षण) करण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच पालिकेच्या परिचारीका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची सोय देखील याठिकाणी लवकरच करण्यात येणार आहे या तिन्ही ठिकाणी महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग स्त्रीरोग व औषधशास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी गरजेनुसार निर्धारित दिवशी आपल्या वैद्यकीय सेवा देणार आहेत. त्यामुळे या तिन्ही गावांच्या परिसरातील नागरिकांना मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन त्यांच्या गावातच उपलब्ध होणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार येथील रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात देखील दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.पालिकेचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर सर्वोपचार रुग्णालय आणि पालघर जिल्हाच्या आरोग्य विभागाचा संलग्नता कार्यक्रम नुकताच कामन येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात संपन्न झाला. या कार्यक्रमाला पालघर जिल्हा परिषद सदस्य व रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती चित्रा किणी, पंचायत समिती सदस्य आत्माराम ठाकरे, पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी,
पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे व जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण अडसूळ, पालघर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे डॉ. सागर पाटील व डॉ. मिलींद चव्हाण यांच्यासह संबंधित मान्यवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget