म्हसळा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

म्हसळा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

म्हसळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बँरिस्टर ए.आर.अंतुलेसाहेब यांनी स्थापन केलेल्या आणि कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित म्हसळा येथील वसंतराव नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील  सांस्कृतीक विभागाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती यांचा ९८ वी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमची  सुरूवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.श्री.जाधव एम एस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला त्यानंतर कु.मयुरी मेकडे याविद्यार्थीनीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकणारे भाषण केले त्यानंतर महाविद्यालयातील  व्यवसायिक अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.भोसले के एस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि त्याची साहीत्यसंपदा याविषयावर विविध उदाहरणाच्या साह्याने विचार मांडले महाविद्यालयात साज-या झालेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी कु.ग्रीष्मा पोतदार हीने केले तर आभार प्रदर्शन कु.शिंदे हीने केले कार्यक्रममाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. शिरीष समेळ  यांच्या मार्गदर्शन खाली श्री.कातकर , श्री. राजेश गोविलकर, अक्षय बांद्रे , निखिल कदम ,ओकार खोत या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले  कार्यक्रमास  बहुसंख्य विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget