गणेशोत्सव अधिक आनंददायी होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्‍न करुया – महापौर


श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिकेचे महापौरांच्‍या हस्‍ते प्रकाशन करताना वरील दृश्य

 मुंबई  ( प्रतिनिधी ) –    बृहन्मुंबई क्षेत्रातील नागरिकांसाठी तसेच त्यांच्या परिवारांसाठी गणेशोत्सव म्हणजे एक पर्वणीच असून हा गणेशोत्‍सव अधिक आनंददायी होण्‍यासाठी गणेशोत्सव समन्वय समिती सोबतच सर्वांनी मिळून एकजुटीने प्रयत्‍न करुया,  असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ व अन्य मंडळे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आज गुरुवारी सायंकाळी पालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी पालिकेतर्फे दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱया गणेशोत्सव – २०१८ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या हस्‍ते पार पडले, त्‍यावेळी ते बोलत होते. बैठकीला उप महापौर श्रीमती हेमांगी वरळीकर, सभागृह नेता श्रीम.विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका आयुक्त अजोय मेहता,  सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती (उपनगरे) चे अध्यक्ष तथा माजी मंत्री  लिलाधर डाके, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबांवकर, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत, उप आयुक्त (परिमंडळ – २) व गणेशोत्सवाचे समन्वयक नरेंद्र बरडे, सर्व परिमंडळीय उप आयुक्त व संबंधित सहाय्यक आयुक्त व पालिका अधिकारी हे याप्रसंगी उपस्थित होते.महापौर मार्गदर्शन करताना  म्हणाले बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी श्री गणेशोत्सव आगमनानिमित्त करण्यात येणारी तयारी ही भव्यदिव्य आणि समाधानी असते. देशभरासह जगातील लोक उत्साहाने यात सहभागी होतात. मुंबईतील गणेशमंडळाच्‍या वतीने समन्‍वय समितीने मांडलेल्‍या सूचनांचे निराकरण करणे हा मुख्‍य उद्देश बैठक आयोजित करण्‍यामागे असल्‍याचे महापौरांनी सांगितले. श्री गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरुन घ्यावे. पालिका प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल, याचेही नियोजन करण्याबाबत महापौरांनी निर्देश दिले. श्री गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील वृक्षांच्या फांद्या छाटणी करण्याच्याही सूचना महापौरांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.तर पालिका आयुक्त  अजोय मेहता मार्गदर्शन करताना म्‍हणाले गणेशोत्‍सव मंडळाना परवानगीसाठी ऑनलाईन पध्‍दत यावर्षीपासून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सुरु केली असून गणेश मंडळांनी परवानगीसाठी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले. गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम प्रशासनाकडून पूर्ण केले जाईल. संबंधित गणेशमंडळानी खड्ड्यांबाबत त्‍या त्‍या विभागाचे उप आयुक्‍त व सहाय्यक आयुक्‍त यांच्‍याकडे आपली तक्रार नोंदविल्‍यानंतर लगेच खड्डे बुजविण्‍यात येईल असेही त्‍यांनी सांगितले.. श्री गणेशोत्सव अधिक आनंददायी व मोठय़ा उत्साहात साजरा करताना गणेश मंडळांना प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले. चौपाटयांवर जेलीफि‍शचे प्रमाण बघता प्रशासनाकडून आरोग्याच्यादृष्टीने योग्‍य ती खबरदारी घेण्‍यात येत असून नागरिकांनीही आपापल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहनही  आयुक्तांनी केले आहे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष  नरेश दहिबांवकर, सुरेश सरनोबत यांच्यासह इतर मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन करताना काही सूचना केल्या. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. तसेच उप आयुक्‍त (परिमंडळ – २) व श्री गणेशोत्‍सवाचे समन्‍वयक नरेंद्र बरडे यांनी एकंदरित पालिकेने केलेल्‍या कामांचा तसेच तयारीचा एकंदरित आढावा घेतला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget