खोपोली -खालापुरात शांततेत शंभर टक्के बंद यशस्वी .

खोपोली -खालापुरात शांततेत शंभर टक्के बंद यशस्वी .
एक्सप्रेस व महामार्गावरही सर्व व्यवसाय बंद.

खोपोली प्रतिनिधी:-
ऑगस्ट क्रांती दिनी,  मराठा आरक्षण व इतर प्रमुख मागण्यासाठी  सखल मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला खोपोली शहर व खालापूर तालुक्यात शंभर टक्के यश मिळाले. सकाळी साडे दहा वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून सखल मराठा समाजाच्या कार्यकर्तेत्यांनी या बंदची हाक दिली .
अकरा वाजता खालापूर तहसीलदार कार्यलाय बाहेर धरणे आंदोलन त्यांनंतर  दोन्ही महामार्गावर ठिय्या आंदोलन व दुपारी खोपोलीतील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ राज्य व केंद्र सरकारला मराठा आरक्षण देणार की सत्तेतून बाहेर जाणार असा जाब सखल मराठा समाजाने विचारून अंतिम इशारा दिला.

बंदच्या काळात खोपोली व खालापुरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही . एक्स्प्रेस वे व मुबंई -पुणे महामार्ग वरील सर्व व्यवसाय सकाळ पासूनच उस्फुर्त पणाने बंद ठेवण्यात आली . खोपोली बाजारपेठ, भाजी मार्केट , मटण मासळी बाजार ,सर्व शाळा महाविद्याये , मोठी व्यापारी संकुले सकाळ पासूनच बंद ठेवण्यात आली होती .बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना घडू नये म्हणून , सकाळीच पोलिसांनी शहरात संचलन करून , दिवसभर सर्व प्रमुख ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता .

कोणत्याही स्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे , शेतकऱ्यांना उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळालाच पाहिजे , मराठा क्रांतीचा विजय असो, फडणवीस सरकार हाय हाय , अशा घोषणा देत सखल मराठा समाजाने संपूर्ण खोपोली शहर व खालापूर तहसीलदार कार्यालय परिसर दणाणून सोडला होता .आंदोलनाच्या शेवटी प्रशासन व पोलीस व्यवस्था, सर्व व्यापारी असोसिएशन , इतर समाजातील सर्व  बांधव व विविध समाज संघटना  , रिक्षा संघटना , खासगी प्रवासी व मालवाहतूक संघटना ,हॉटेल व्यावसायिक यांनी बंदच्या काळात उस्फूर्त पणाने बंद पाडून सहकार्य केले .
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget