मुंबईसह महाराष्ट्र बंद, नवी मुंबई, ठाणे वगळले अत्यावश्यक सेवा बाधित होणार नाही

मुंबईसह महाराष्ट्र बंद, नवी मुंबई, ठाणे वगळले
अत्यावश्यक सेवा बाधित होणार नाही
Image result for maratha morcha preparation


मुंबई ( प्रतिनिधी ) : आतापर्यंत ५८ मोर्चे शांंततेत काढूनही राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे ९ ऑगस्ट क्रांती दिनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले असून नवी मुंबई, ठाणे वगळता संपूर्ण राज्यभर  बंद पाळण्यात येईल, असे सकल मराठाचे समन्वयक अमोल जाधवराव यांनी सांगितले. दादर शिवाजी मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, काही मुस्लिम समाजातील नेत्या़चाही मराठा समाजाच्या बंदला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. 

 मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने अनेक वेळा बंदची हाक दिली आहे.  परंतु राज्य सरकारकडून वेळोवेळी फक्त आश्वासनेच देण्यात आली. मात्र गुरुवारी होणारे मुंबई बंद आंदोलन तीव्र होणार असून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा जाधवराव    यांनी दिला. दरम्यान, मुंबईसह राज्यातील अनेक भागात उत्स्फूत बंद पाळण्यात येईल, असेही ते म्हणाले. ९ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येत असून भविष्यात ९ ऑगस्ट मराठा क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येईल, असे केदार सुर्यवंशी म्हणाले. 

मराठा समाजात फुट पडली नसून प्रत्येक जण आपल्या स्तरावर आंदोलन करत आहे. गुरुवारी होणारी आंदोलन हे शांततेत पार पडणार असून कार्यकत्याँना ही शांततेत आंदोलन करण्याचे आव्हान केल्याचे जाधवराव म्हणाले. मुंबईसह राज्यात प्रत्येक जण आपल्या स्तरावर आंदोलन करणार आहे, असेही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री जोपर्यत लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, असेही जाधवराव म्हणाले. दरम्यान, शाळा, काँलेज, दूध, मेडिकल अशा अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, असे जाधवराव यांनी सांगितले
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget