डॉ. शैलेश श्रीवास्तव यांनी दूरदर्शन संबंधित क्षेत्राकडे विद्यार्थांनी वळाव यासाठी केले मार्गदर्शन.

डॉ. शैलेश श्रीवास्तव यांनी दूरदर्शन संबंधित क्षेत्राकडे विद्यार्थांनी वळाव यासाठी केले मार्गदर्शन.

साक्षी तावडे
हिंदी विद्या प्रचार समिती द्वारा संचालित रामनिरंजन झुनझनवाला महाविद्यालयाच्या "हिंदी साहित्य" परिषदेचे उद्घाटन, गुरुवार, 23 ऑगस्ट  2018 रोजी पार पडले. या वेळी  दूरदर्शनच्या सहाय्यक निर्देशक व सुप्रसिद्ध गायिका डॉ. शैलेश श्रीवास्तव या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
दीप प्रज्वलन झाल्यानंतर प्रा . डॉ. हिमांशू दावडा यांनी मुख्य अतिथी यांचे स्वागत केले व हिंदी विभागाध्यक्षा डॉ. मिथिलेश शर्मा  यांनी मुख्य अतिथींचा परिचय करून दिला .
डॉ. शैलेश श्रीवास्तव यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत " दूरदर्शन या क्षेत्रामधून उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी " या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देऊन विद्यार्थांनी या क्षेत्राकडे वळलं पाहिजे यासाठी प्रोत्साहन दिले. आजचं युग हे स्पर्धेचं युग असून आपण आपल्या ज्ञानाच्याचं जोरावर पुढे जाऊ शकतो असे त्यांनी सांगितले त्याच बरोबर त्यांनी त्यांच्या मधूरशा आवाजात गाणं ऐकवून सर्वांना मंत्रमुग्ध केले .
या प्रसंगी वेगवेगळ्या विषयांचे विभागाध्यक्ष डॉ. स्नेहा देऊस्कर,  डॉ. नीलांबरी कुलकर्णी,  डॉ. नीता चक्रवर्ती , उपप्राचार्या डाॅ. शुभांगी वर्तक, डॉ. सीमा रत्नपारखी तसेच प्राध्यापक सी.पी.सिंह , संजय सिंह, तेजबहादर सिंह, अशोक गुप्ता उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर प्रा. अजय सिंह यांनी सर्वांचे आभार मानले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget