प्रेमानंद रूपवतेंच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू नेतृत्व हरपले - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेप्रेमानंद रूपवतेंच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे  अभ्यासू नेतृत्व  हरपले - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

 मुंबई - अहमदनगरच्या अकोले तालुक्यात भंडारदरा येथे दरवर्षी धम्मयात्रा आयोजित करून विचारमंथन घडविणारे ; काँग्रेस पक्षात जरी काम करीत असले तरी आंबेडकरी चळवळीची नाळ घट्ट असणारे प्रेमानंद रुपवते यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचे  अभ्यासू नेतृत्व हरपले आहे अश्या शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत प्रेमानंद रुपवते यांना आदरांजली वाहिली आहे.

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दादासाहेब रुपवते यांचे प्रेमानंद रुपवते सुपुत्र होते.दादासाहेबांचा चळवळीचा समाजसेवेचा  वैचारीक वारसा प्रेमानंद रुपवतेंनी समर्थपणे सांभाळला.आमदार मधुकरराव  चौधरी यांचे प्रेमानंद रुपवते जावई  होते.मुंबईत बांद्रा येथील चेतना कॉलेज चे विश्वस्त म्हणून त्यांनी चांगले काम केले. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात ते अग्रेसर होते. त्यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण सबंध होते. प्रेमानंद रुपवते यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी  हानी झाली आहे अशी शोकभावना ना रामदास आठवलेंनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.


          
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget