स्व. गुरुदास कामत यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांसाठी सदैव झटणारा आणि दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलणारा समर्थ नेता काँग्रेसने कायमचा गमावला आहे - मल्लिकार्जुन खरगे...मुंबई प्रतिनिधी:
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या पुढाकाराने आज माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ दिवंगत नेते स्व. गुरुदास कामत यांची सर्वपक्षीय शोकसभा काळ यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळेस गुरुदास कामत याना श्रद्धांजली देताना ऑल इंडिया काँग्रेस कमिटी चे सेक्रेटरी आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी म्हणाले की, स्व. गुरुदास कामत यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाच्या विचारांशी सदैव एकनिष्ठ असलेला आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी उभा राहणारा नेता कायमचा गमावला आहे. काँग्रेस पक्षाचे आणि देशाच्या संपूर्ण राजकारणाचे हे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. गुरुदास कामत 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिवपद ही त्यांनी भूषविलेले आहे. केंद्रामध्ये मंत्री होते. पण पक्षाकडून आणि जनतेने जी जबाबदारी त्यांना दिली. ती त्यांनी समर्थपणे पेलली आणि चोखपणे बजावली. ज्या दिवशी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. कधीही स्वतःची चिंता पक्षाची, कार्यकर्त्यांची आणि जनतेची चिंता करणारे ते नेते होते. स्वतःचे विचार ते स्पष्टपणे मांडत असत. परिणामी राजीनामा द्यायलाही त्यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. आपल्याला त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यायला हवी. ईश्वरचरणी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.


माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अशोक चव्हाण स्व. गुरुदास कामत यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले की, स्व. गुरुदास कामत यांच्या जाण्याने माझा खूप जवळचा मित्र मी कायमचा गमावला आहे. युवक काँग्रेस ते ऑल इंडिया काँग्रेस कमिटी असा त्यांचा संपूर्ण प्रवास मी पाहिलेला आहे. 5 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. मुंबईतील सर्व प्रकल्प आणि विकासासंबंधी प्रश्नांचा ते मंत्रालयापासून पाठपुरावा करत असत. मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहून त्यांनी पक्षबांधणीचे काम केले. राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांत त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली. राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला जे काही यश मिळाले, त्यात स्व. गुरुदास कामत यांचा सिंहाचा वाटा होता. राजीव गांधींच्या प्रति त्यांना प्रचंड आस्था होती. त्यांच्या जाण्याने पक्षाचे तर नुकसान झालेच, पण देशाचा एक स्वाभिमानी आणि आपल्या व पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ असलेला नेता कायमचा काळाच्या पडद्याआड गेला.


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळेस बोलताना म्हणाले की, स्व. गुरुदास कामतजी जरी मुंबई काँग्रेसमध्ये सक्रिय असले, तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये ही त्यांना विशेष स्थान होते. महाराष्ट्रातील तळागाळातील कार्यकर्त्यांचे प्रश्न ते स्पष्टपणे मांडत आणि त्यांचा पाठपुरावा ते मंत्रालयातही करत. यावरूनच त्यांची कार्यकर्त्यांबद्दल असलेली तळमळ दिसून येते. ते केंद्रामध्ये दूरसंचार मंत्री असताना माझा त्यांच्याशी फार जवळचा संबंध आला. दुरसंचारमंत्री असताना त्यांना जर काही प्रश्न उद्भवले तर ते स्पष्टपणे मांडत असत. चर्चा करत असत.एखादा निर्णय जर त्यांना अयोग्य वाटला, तर पक्षशिस्त न सोडता पत्राद्वारे ते आपले त्या निर्णयाबाबतचे मत कळवत असत. कधी ही अंतर्गत गोष्टींचा त्यांनी गौप्यस्फोट केला नाही. त्यांच्या जाण्याने काँग्रेसची आणि देशाची मोठी हानी झाली आहे.


या शोकसभेमध्ये सर्व पक्षांचे इतर राजकीय नेते सुद्धा उपस्थित होते. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रकाश मेहता, माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा, गोवा काँग्रेसचे प्रभारी अमित विलासराव देशमुख, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नदीम जावेद, खासदार राजीव शुक्ल, आमदार कपिल पाटील यांनी यावेळेस स्व. गुरुदास कामत याना श्रद्धांजली अर्पण केली.


याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेसचे सर्वस्वी आजीमाजी खासदार व आमदार, नगरसेवक, मुंबई काँग्रेसचे महासचिव भूषण पाटील, संदेश कोंडविलकर, मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या शोकसभेत सम्मीलीत झाले होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget