आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा नाही अशा पाड्यांना टँकरने पाणी पुरवा - पालिका आयुक्तआदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा नाही अशा पाड्यांना टँकरने पाणी पुरवा - पालिका आयुक्त


   मुंबई  ( प्रतिनिधी ) –   आदिवासी पाड्यांच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही, त्या परिसरांसाठी २ पिण्याच्या पाण्याचे टॅन्कर दररोज पाठविण्यात यावे तसेच या परिसरात बोरिवली पासून गोराई पर्यंत पाण्याची जलवाहिनी टाकून हा प्रश्न कायमचा सोडविण्याच्या दृष्टीने उपलब्ध पर्यांयाची पडताळणी करुन पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिका संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत  
पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिका क्षेत्रातील परिमंडळ ७ मधील काही ठिकाणांचा पाहणी दौरा केला. या दौ-या दरम्यान उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, उपायुक्त (परिमंडळ - ७) अशोक खैरे, 'आर मध्य' विभागाचे सहाय्यक आयुक्त  रमाकांत बिरादार यांच्यासह पालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या दौ-यादरम्यान पालिका आयुक्तांनी प्रामुख्याने 'आर मध्य' विभागातील गोराई, जामझाड पाडा, हौद पाडा, बाबर पाडा, जुई पाडा, आंबेडकर नगर, छोटी डोंगरी, मोठी डोंगरी आदी परिसरांना भेट दिली त्यावेळी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी वरील निदॅश दिले आयुक्तांनी पालिका क्षेत्रातील गोराई परिसरात एस्सेल वर्ल्ड, वॉटर किंग्डम यासारखा पर्यटकांनी गजबजणारा परिसर आहे. या परिसराच्या जवळपास अग्निशमन केंद्र असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन एस्सेल वर्ल्डच्या वाहनतळ परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही  आयुक्तांनी दिले. तर एस्सेल वर्ल्डच्या प्रतिनिधींनी देखील अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक तेवढी जागा देण्याबद्दल सहमती दर्शविली. ज्या पाड्यांच्या परिसरात यापूर्वी लावण्यात आलेले सौरउर्जेचे दिवे बंद अवस्थेत आहेत, ते तातडीने दुरुस्त करुन कार्यरत करण्याची कार्यवाही करावी, असेही आदेश पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत खात्याच्या प्रमुख अभियंत्यांना देण्यात आले. गोराई व्हिलेजमधील केवळ ४ वर्ग खोल्या असणा-या मनपा शाळेला देखील आयुक्तांनी भेट दिली. याठिकाणी ५ मजली शाळेच्या प्रस्तावित आराखड्यानुसार शाळा बांधकामाच्या कार्यवाहीला सुरुवात करावी तसेच गोराई व्हिलेज परिसरात पालिकेचा दवाखाना असून सदर बांधकाम १०१ वर्षांपूर्वी म्हणजेच सन १९१७ मध्ये करण्यात आलेले आहे. अतिवृष्टी दरम्यान या दवाखान्यात एक फूट पाणी भरते, असा अनुभव आहे. हे लक्षात घेऊन या दवाखान्याच्या पुनर्बांधकामाची कार्यवाही तातडीने हाती घ्यावी, गोराई परिसरातील एक भूखंड हा शाळेसाठी राखीव आहे. मात्र या परिसरात प्रसुतीगृह व दवाखान्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन सदर भूखंडाचा भू-वापर बदलविण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यासह सदर भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरु करावी,  गोराई समुद्र किना-याजवळच्या शौचालयाची अवस्था लक्षात घेता, सदर परिसरात अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त शौचालयाच्या बांधकामाची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे आदेशही या दौ-यादरम्यान देण्यात आले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget