गणपती मंडळांना ऑनलाईन परवानग्या प्रक्रीया यशस्वी


   मुंबई  ( प्रतिनिधी ) –  पालिकेद्वारे देण्यात येणा-या विविध सोयी सुविधा विषयक परवानग्या नागरिकांना अधिकाधिक सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने अनेक सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यास यापूर्वीच सुरुवात करण्यात आलेली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून यावर्षापासून विविध उत्सवांसंबंधी मंडप परवानग्याही ऑनलाईन देण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत यावर्षी गणपती मंडळांना ऑनलाईन पद्धतीने परवानग्या देण्याची प्रक्रिया वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने अत्यंत यशस्वीपणे व निर्दोषपणे राबविण्यात येत आहे.
यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन परवानगी देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने अर्जदारांना कागदपत्रे सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. यातून पालिकेकडे गणेश मंडळांचा अभिलेख तयार होणार असून त्यामुळे ज्या गणेश मंडळांच्या प्राथमिक स्वरुपाच्या कागदपत्रांमध्ये बदल नसेल, त्यांना पुढील वर्षापासून ती कागदपत्रे पुन्हा सादर करावी लागणार नाहीत. ऑनलाईन परवानग्या देण्यासाठी पालिकेच्या सर्वच विभागीय कार्यालयात संबंधित कर्मचारी गणेश मंडळांना सक्रिय सहकार्य करीत आहेत. यामुळेच यावर्षी २६९४ विक्रमी अर्ज आले असून त्‍यापैकी एकाच मंडळाचे अनेक अर्ज इत्‍यादी कारणामुळे ५९४ अर्ज रद्द केले आहेत. राहि‍लेल्‍या २१०० अर्जांपैकी एकूण १४२५ परवानग्‍या (६७ टक्के) देण्‍यात आल्‍या आहेत. पालिका व पोलिसांच्‍या छाननीमध्‍ये २२३ अर्ज (१० टक्‍के) नाकारण्‍यात आले आहेत. तसेच उरलेल्‍या ४५२ (२३ टक्के) अर्जांवर पुढील दोन दिवसात निर्णय घेण्‍यात येऊन मंडप परवानगी प्रक्रिया यशस्‍वीपणे पूर्णत्‍वास नेण्‍यात येईल, असे पालिका प्रशासनाने कळविले आहे.उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटीनुसारच ह्या परवानग्या दिल्या जाणार असून; अग्निशमन नियम, पदपथ पादचा-यांना मोकळे ठेवणे, वाहतुकीस अडथळा न होऊ देणे इत्यादी अटी पाळणे आवश्यकच असून त्या अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. गणपती मंडळांना ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत अर्ज करण्याची वाढीव मुदत देण्यात आलेली असून; ज्यांचे अर्ज त्रुटींमुळे फेटाळलेले आहेत, त्यांनीही त्या त्रुटींची पूर्तता करुन मुदतीत फेरअर्ज केल्यास त्यांनाही परवानगी मिळू शकेल सर्व गणेश मंडळांनी पालिकेची पूर्व परवानगी घेऊनच मंडप उभारावेत, असे आवाहन पालिकेच्या वतीने परिमंडळ – २ चे उप आयुक्‍त व  महापालिका गणेशोत्‍सवाचे समन्‍वयक नरेंद्र बरडे यांनी केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget