दिव्यांगांच्या समस्याच्या बैठकीत प्रचंड गदारोळ बैठक तहकूब

दिव्यांगांच्या समस्याच्या बैठकीत प्रचंड गदारोळ
बैठक तहकूब

मुंबई ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील दिव्यांग मोठ्या प्रमाणात असून अनेक समस्या पासून ते वंचित आहेत या दिव्यांगांच्या समस्यांच्या चर्चां विषयी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज मंगळवारी पालिका मुख्यालयात बैठक आयोजित केली होती मात्र  दिव्यांगांच्या काही गटाने या बैठकीच्यावेळी गदारोळ करण्यास सुरुवात केली हा गदारोळ शांत होत नसल्यामुळे यांच्या समस्यावर कोणतीही चर्चा न करता बैठक तहकूब करण्यात आली.
मुंबईतील दिव्यांगांच्या विविध समस्यांबद्दल पालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू होती. बैठकीला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, उपायुक्त (विशेष) निधी चौधरी आणि मिलिन सावंत तसेच मुंबईतील दिव्यांगाच्या संस्थांचे पदाधिकारी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. बैठक सुरु होताच दिव्यांगांच्या समस्यांविषयी उहापोह करण्यात आला. समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालिकेने काय उपाययोजना केल्या आहेत, कोणकोणते निर्णय घेतले आहेत, याबाबत अतिरिक्त आयुक्त जऱ्हाड आणि उपायुक्त (विशेष) चौधरी यांनी माहिती देण्यास सुरुवात केली. दिव्यांगांना देण्यात आलेल्या स्टॉल्सवर सिगारेट, बिडी आदी वस्तू ठेवता येणार नाहीत. त्याची विक्री करण्यास मनाई आहे, असे चौधरी यांनी सांगताच काही दिव्यांगांनी आरडाओरड करुन त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणला. सुमारे 15 मिनिटे हा गोंधळ सुरु होता. तो संपत नसल्याचे पाहून मनोहर जोशी यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची सुचना केली. तरीही आरडाओरड सुरुच राहील्याने जोशी यांनी बैठक तहकूब करण्याची सूचना महापौरांना केली. यानंतर महापौर विश्‍वनाथ महाडेश्वर यांनी ती तात्काळ मान्य करीत बैठक तहकूब केली या यांच्या गदारोळमुळे बैठक तहकूब करण्यात आली
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget