मानखुर्दच्या 'कुर्ला स्क्रॅप' परिसरातील ६२ अतिक्रमणे तोडली ४ एकर क्षेत्रफळाच्या शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटविली

मानखुर्दच्या 'कुर्ला स्क्रॅप' परिसरातील ६२ अतिक्रमणे तोडली
४ एकर क्षेत्रफळाच्या शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटविली

मुंबई पोलीसांच्या सहकार्याने अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई
  मुंबई ( प्रतिनिधी ) –  पालिकेच्या 'एम पूर्व' विभागातील मानखुर्द मध्ये 'मंडाळा' भागात 'कुर्ला स्क्रॅप' परिसर आहे. याच परिसरातील सुमारे ४ एकर क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे, दुकाने इत्यादी व्यवसायिक स्वरुपाची बांधकामे उद्भविली होती. याबाबत मुंबई उपगनर जिल्ह्याच्या संबंधित कार्यालयास पालिकेच्या 'एम पूर्व' विभागाद्वारे यापूर्वीच कळविण्यात आले होते. या अनुषंगाने चेंबूर भागाचे उपजिल्हाधिकारी (अतिक्रमणे निर्मूलने) यांनी या अतिक्रमण कारवाईसाठी मनुष्यबळ व यंत्रसामुग्री पुरविण्याची मागणी 'एम पूर्व' विभागाकडे केली होती. यानुसार आवश्यक ती यंत्रसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध करुन देत 'कुर्ला स्क्रॅप' परिसरातील ६२ अनधिकृत बांधकामे नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान तोडण्यात आली आहेत, अशी माहिती 'एम पूर्व' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.
पालिकेच्या परिमंडळ – ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार 'एम पूर्व' विभागाद्वारे 'कुर्ला स्क्रॅप' परिसरातील अनधिकृत बांधकामांवर नुकतीच धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पालिकेचे ३५ कामगार – कर्मचारी - अधिकारी सहभागी झाले होते. तसेच या कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या २५ पोलीस कर्मचारी - अधिकारी यांचा ताफाही घटनास्थळी तैनात होता. मुंबई पोलीसांच्या मदतीने यशस्वीपणे करण्यात आलेल्या या पाडकाम कारवाई दरम्यान २ जेसीबी, ४ डंपर, १ पोकलेन यासह इतर आवश्यक वाहने व साधनसामुग्री देखील वापरण्यात आली, अशीही माहिती किलजे यांनी दिली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget