गणपती मंडळाच्‍या परवानगीसाठी सुट्टीच्‍या दिवशीही पालिका कार्यालये सुरु राहणार

गणपती मंडळाच्‍या परवानगीसाठी सुट्टीच्‍या दिवशीही
पालिका कार्यालये सुरु राहणार
    मुंबई ( प्रतिनिधी ) –  पालिका क्षेत्रातील गणपती मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्यासाठी येणारा चौथा शनिवार २५ व २६ ऑगस्‍ट २०१८ रोजी पालिकेची सर्व विभाग कार्यालये सुरु राहणार असून मंडळांनी आपली कागदपत्रे संबंधीत विभाग कार्यालयात सादर करुन मंडपासाठीची रितसर परवानगी पालिकेकडून प्राप्‍त करुन घ्‍यावी,  असे आवाहन   मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी आज गुरुवारी सायंकाळी पालिका अधिकाऱयांसमवेत पालिका मुख्‍यालयात आयोजित एका प‍त्रकार परिषदेत केले.
   याप्रसंगी उप महापौर श्रीम.हेमांगी वरळीकर, नगरसेवक अनंत नर, नगरसेविका श्रीम. रिध्‍दी खुरसुंगे,  अतिरिक्‍त पालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे)  विजय सिंघल,  शिवसेना नेते लिलाधर डाके,  मुंबई उपनगरे गणेश उत्‍सव समन्‍वय समितीचे सचिव व माजी आमदार विनोद घोसाळकर,  बृहन्‍मुंबई सार्वजनिक गणशोत्‍सव  स‍मन्‍वय समितीचे अध्‍यक्ष नरेश दहिबावकर,  उप आयुक्‍त (परिमंडळ - २) नरेंद्र बरडे  तसेच विविध विभागाचे सहाय्यक आयुक्‍त तसेच संबंधित पालिका अधिकारी उपस्थित होते प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महापौर म्‍हणाले की,  १४६३ गणेश मंडळांपैकी ११३३ गणेश मंडळांचे अर्ज पालिकेला प्राप्‍त झाले असून त्‍यापैकी ५२७ गणेश मंडळांना परवानगी देण्‍यात आली आहे . त्‍याचप्रमाणे उर्वरित गणेश मंडळाना परवानगी देण्‍याचे काम सुरु असून पालिकेकडे आलेल्‍या सर्वच अर्जांना येत्‍या दोन ते तीन दिवसात सर्वच गणेश मंडळांना ऑनलाईन परवानगी पालिकेकडून प्राप्‍त होणार असल्‍याचेही महापौरांनी स्‍पष्‍ट केले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget