पालिका आरोग्य सेविकांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढा मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना निर्देश मंगळवारी पालिकेत निर्णायक बैठक

पालिका आरोग्य सेविकांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढा मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना निर्देश
मंगळवारी पालिकेत निर्णायक बैठक

मुंबई  ( प्रतिनिधी ) –   पालिका आरोग्य सेविकांच्या विविध मागण्यांवर तातडीने तोडगा काढा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना आज शनिवारी दिले. त्यानुसार ही बैठक मंगळवारी पालिकेत होणार आहे.

पालिकेच्या सेवेत असलेल्या 4 हजारांहून अधिक आरोग्य सेविकांच्या प्रश्नावर आज शनिवारी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या सेविकांचे आंदोलन आझाद मैदानावर सुरू होते तेथे जाऊन प्रथम आमदार अॅड.  शेलार यांनी त्यांची भेट घेतली व शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला घेऊन गेले.
या शिष्टमंडळात पालिका आरोग्य सेवा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास, सरचिटणीस  अॅड. विदुला पाटील, आणि आरोग्यसेवीकांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत या शिष्टमंडळातर्फे अॅड. प्रकाश देवदास यांनी मागण्या मांडल्या. त्यामधे कामगार कायद्या प्रमाणे आरोग्य सेविकांना किमान वेतन देण्यात यावे, प्रसुती रजा मिळावी तसेच त्यांना भविष्य निर्वाह निधी व इतर तरतुदी, घर भाडे भत्ता व संबंधित फायदे त्यांना देण्यात यावेत अशा विविध मागण्या मांडल्या.काल याच मागण्या घेऊन याच शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली होती.
आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे या सेविकांची बाजू मांडताना आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्याच्या सर्व योजना घराघरात पोहचवण्याचे काम या सेविकांच करीत असून त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने विचार करून त्यांना कामगार  कायद्याप्रमाणे सुविधा मिळाव्यात. त्यासाठी आयुक्तांना तातडीने निर्देश द्यावे अशी विनंती  आमदार अॅड. शेलार यांनी केली.  मुख्यमंत्र्यांनी तातडीने आयुक्तांना फोन करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले. तसेच या सेविकांचे आझाद मैदान येथे सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, मंगळवारी या विषयावर पालिका आयुक्तांकडे महत्वाची संयुक्त बैठक होणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget