आचार्य अत्रे यांचे साहित्‍य तरुणांना प्रेरणादायी - महापौर

आचार्य अत्रे यांचे साहित्‍य तरुणांना प्रेरणादायी -  महापौर
वरळी नाका चौकातील आचार्य अत्रे यांच्‍या पुर्णाकृती पुतळयाला महापौरांचे अभि‍वादन


मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – आचार्य अत्रे यांनी चौफेर लेखन केलेले असल्‍याने त्‍यांचे साहित्‍य म्‍हणजे एक वैचारिक मेजवानी असून त्‍यांच्‍या साहित्‍यातून स्‍वतःचे मनाचे सामर्थ्‍य वाढून ज्ञानाच्‍या कक्षा रुंदावणे ,  हा उद्देशच आजच तरुण पिढीला प्रेरणादायी असून प्रत्‍येकाने आचार्य अत्रे यांची साहित्‍यसंपदा जरुर वाचावी,  असे प्रति‍पादन  मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.
  'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' या आंदोलनाचे अग्रणी तसेच सुप्रसिद्ध लेखक, वक्ते आचार्य उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२० व्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी आज सोमवारी सकाळी वरळी नाका चौकातील आचार्य अत्रे यांच्‍या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला,  त्यावेळी आयोजित छोटेखानी समारंभात ते बोलत होते.याप्रसंगी बेस्‍ट समिती अध्‍यक्ष आशिष चेंबुरकर, स्‍थानिक नगरसेवक दत्‍ता नरवणकर,  नगरसेवक अरविंद भोसले,  आचार्य अत्रे स्‍मारक समितीच्‍या अध्‍यक्षा श्रीम. आरती सदावर्ते व स‍मि‍तीचे इतर सदस्‍यगण तसेच नागरिक उपस्थित होते  महापौर महाडेश्‍वर संबोधित करताना म्हणाले आचार्य अत्रे यांचे 'मी कसा झालो' हे जीवनपट वाचले तरी त्यांची जडणघडण आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे बहुआयामी पैलू कळतात. लिहिणारे खूप असतात पण आचार्य अत्रे यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या सिद्धहस्त लेखणीतून जे काही उतरले ते महत्त्वाचं आहे. येणाऱया आवाहनांना सामोरे जाताना संघटितपणा तसेच सांघि‍क ताकद असणे आवश्‍यक असल्‍याचे महापौरांनी सांगितले. आजही समाजात अंधश्रध्‍दा असून विज्ञानवादी दृष्‍टीकोनातून आपण सर्वांनी वागले पाहिजे . अत्रेंची ग्रंथसंपदा भावी पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा, त्याची प्रेरणा आचार्य अत्रे यांच्या नजरेतून त्यांना कळली पाहिजे, असेही महापौरांनी यावेळी नमूद केले  कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक नगरसेवक अरविंद भोसले यांनी तर आभारप्रदर्शन आचार्य अत्रे स्‍मारक समितीच्‍या अध्‍यक्षा श्रीम. आरती सदावर्ते यांनी केले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget