खोपोली के.एम.सी.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उचलले प्लस्टीक बंदीसाठी पाउले


खोपोली बाजारपेठेत केली प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती

खोपोली:
एकदा निर्माण झालेलं प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. या उलट त्याचे तुकडे पडून ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदी-नाल्यात मिसळत जाऊन ते प्राण्यांच्या तोंडी येतात. काही वेळेस असे प्राणी मनुष्याच्या पोटात गेल्यावर याच प्लास्टिकचा अंश आपल्याही पोटात जात असतो. त्यामुळे अनेकांना प्लास्टिकमुळे असंख्य आजार ही बळावले आहेत. १९५० च्या सुमारास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ लागला व साठच्या दशकानंतर तो वाढतच गेला, तेव्हापासून निर्माण झालेला एकही प्लास्टिकचा तुकडा अद्याप नष्ट झालेला नाही. तो आजही तसाच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तसाच पृथ्वीवर टिकून असल्याने प्लास्टिक हा सर्वात धोकादायक ठरत असल्याने प्लास्टिक बंदीसाठी भारत सरकारने सर्व स्तरावर उपाययोजना राबविल्या जात असून यासाठी सर्वत्र जनजागृती ही असंख्य प्रसार माध्यमातून केली जात आहे. प्लास्टिक बंदी व्हावी उद्देशाने खोपोली शहरातील के.एम.सी.महाविद्यालयातील प्राध्यापक मुकेश रुपवते यांच्या मार्गदर्शनाखाली एफ.वाय.बीएससी शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पायाभूत अभ्यासक्रम अंतर्गत सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने खोपोली शहरातील बाजारपेठेत प्रभातफेरी काढत "प्लास्टिक बंदीचा" नारा देऊन कापडी पिशव्या वापरण्याचा संदेश नागरिकांना दिला.


या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे टाकावून कापडी कपड्यापासून विद्यार्थ्यांनी स्वतः कापडी पिशव्या बनवत बाजार पेठेत वाटप केल्या.

यांवेळी सर्व खोपोली करांना प्राध्यापक मुकेश रुपवते व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्याच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget